Nagar Political : महायुतीचा मेळावा म्हणजे खुर्चीसाठी रेटारेटी...! कोपरखळ्या मारण्यात नेत्यांनी मानली धन्यता...

Mahayuti Meeting : आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले शक्तिप्रदर्शन.
Mahayuti Meeting
Mahayuti MeetingSarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News : नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्यातील व्यासपीठावर खुर्चीसाठी रेटारेटी, असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. व्यासपीठावर झालेल्या नेत्यांच्या गर्दीमुळे खुर्चींचे नियोजन कोलमडले होते. जी खुर्ची रिकामी व्हायची, त्यात नेते जाऊन बसत होते. या मेळाव्यात आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले.

मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांचे दोरीतील भाषण वगळता इतर नेत्यांनी कोपरखळ्या मारण्यात धन्यता मानली. महायुतीचा हा पहिला मेळावा असला तरी समन्वयाचा अभाव दिसला. राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली नगर जिल्ह्यात महायुतीच्या मेळावा आयोजिला होता. मेळाव्याच्या ठिकाणी बारा वाजेपर्यंत मोजकेच कार्यकर्ते पोहोचले होते.

Mahayuti Meeting
Chagan Bhujbal :...तर प्रॉपर्टी विका अन् लढा; विरोधकांवर भुजबळांचे टीकास्त्र

प्रा. राम शिंदे हे बारा वाजता आले. त्यानंतर राधाकृष्ण विखे आले. यानंतर मेळाव्याला गर्दी जमली. व्यासपीठावर नेत्यांची गर्दी झाली होती. पहिल्या रांगेत महायुतीमधील नेते बसले होते. तिथेदेखील खुर्च्यांची संख्या कमी असल्याने दाटीवाटी होती. खासदार सुजय विखे हे दुसऱ्या रांगेत बसले होते. तिथे त्यांची उठबस सुरू होती. मेळाव्याच्या ठिकाणी आणि व्यासपीठावरून महायुतीच्या समर्थनार्थ उठून घोषणाबाजी होत होती.

आमदार संग्राम जगताप, शहर-जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मेळावा सुरू झाल्यानंतर एन्ट्री केली. आमदार जगताप यांच्या समर्थनात कार्यकर्त्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी मंत्री विखेंनी हस्तक्षेप करीत थांबवली. यानंतर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. यावेळीदेखील जोरदार घोषणाबाजी झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रहार संघटनेच्या घोषणाबाजीत व्यासपीठासमोर बसलेल्या आमदार जगताप यांच्या समर्थकांनीदेखील सूर मिसळला. अजित पवार आणि जगताप यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे मेळाव्याचा सूर काहीसा बदलला गेला. महायुतीमधील नेते भाषण करीत असताना व्यासपीठावर शेजारी बसलेले मंत्री विखे आणि आमदार शिंदे यांच्यात संवाद रंगला होता.

याचवेळी व्यासपीठावरील नेते मंत्री विखे यांच्याजवळ येऊन वारंवार काहीतरी सांगून जात होते. मागे दुसऱ्या रांगेत बसलेले खासदार सुजय विखे नेत्यांच्या गर्दीचे नियोजन करीत होते. त्यांची उठबस सुरू होते. मेळावा सुरू झाल्यानंतर काही वेळातच व्यासपीठावरून उठून ते बाहेर गेले. थोड्या वेळाने आले. पुन्हा दुसऱ्या रांगेत बसले अन् पुन्हा उठून पाथर्डीला नियोजित कार्यक्रमाला निघून गेले.

राधाकृष्ण विखे आणि प्रा. राम शिंदे या दोघांची दोरीतील भाषण वगळता इतरांनी एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात धन्यता मानली. राम शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी उपस्थितांकडून जोरदार घोषणाबाजी करून घेतली. मंत्री विखे यांच्या भाषणावेळी समर्थनार्थ घोषणाबाजी झाली. शंखनाद झाला. जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.

Mahayuti Meeting
Konkan Politics: ठाकरे गटाची कोकणात जोरदार मोर्चेबांधणी; आमदार साळवींचा मंत्री सामंतांना सूचक इशारा

ठाकरे - पवारांवर हल्लाबोल, तर विखेंच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

राधाकृष्ण विखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हिंदूत्वावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंना देशभक्त असल्याचे सांगण्याची वेळ येणे हा त्यांचा नैतिक पराभव आहे. जितेंद्र आव्हाड आणि उदयनिधी स्टॅलिन या हिंदूविरोधींना उद्धव ठाकरेंकडे जाब विचारण्याची हिंमत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे एक चित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचा दाखला देत विक्रम-वेताळासारखी गत यांची झाल्याचा टोला विखे यांनी लगावला.

आमदार रोहित पवार यांनी तलाठीभरतीबाबत केलेल्या आरोपांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही विखे यांनी सांगितले. देशातील राजकीय धुव्रीकरणात नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार या महायुती मेळाव्यातून घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडे चेहरा नाही. त्यांच्या बैठका म्हणजे, पर्यटन आहे. पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीप हे पर्यटन दाखवून दिले आहे.

तिथेदेखील आता आघाडीची बैठक होईल. देशाची अर्थव्यवस्था 15 व्या स्थानावरून 5 व्या स्थानावर आली आहे. पुढील एका वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ती दुसऱ्या स्थानी असेल. नरेंद्र मोदी हे जगभरातील नेत्यांचे विश्वगुरू झाले आहेत. आमदार संभाळता येत नाही, त्यांचे पक्षदेखील आता बाद झाले आहेत. आता आघाड्या करीत सुटले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी किती जणांपर्यंत पोहोचवल्या, किती ठिकाणी फलक लावले, याची विचारणा करीत मंत्री राधाकृष्ण विखे यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सरकारविषयी नकारात्मक गोष्टी लवकर पोहोचतात, पण सकारात्मक पोहोचत नाहीत. त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे, असेही विखे यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R...

Mahayuti Meeting
Mahayuti News : महायुतीच्या मेळाव्यात एकमेकांना टोमणे अन् चिमटेच..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com