Assembly Elections : तीन राज्यांतील विधानसभा जिंकणारा पक्ष लोकसभा निवडणुकीत पराभूत होतो ? काय सांगतो इतिहास

Political News : पाच राज्यांत मिळून लोकसभेच्या 83 जागा आहेत.
Narendra modi, Amit Shaha, Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Narendra modi, Amit Shaha, Priyanka Gandhi, Rahul GandhiSarakrarnama
Published on
Updated on

2023 Assembly Elections Results in Marathi : निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांत लोकसभेच्या 83 जागा आहेत. या राज्यांमध्ये विजय मिळवणाऱ्यास पुढे विजय मिळवता येऊ शकतो. तथापि, या राज्यातील भूतकाळ व विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास हा अंदाज नाकारलाही जाऊ शकतो. काँग्रेसने 2018 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये विजय मिळवला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपने या पाच राज्यातील 83 जागापैकी 61 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे हा इतिहास विसरता येणार नाही.

Narendra modi, Amit Shaha, Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Assembly Elections Results 2023 : तीन राज्यांतील भाजपच्या विजयावर फडणवीस म्हणाले, ''यातून एक गोष्ट स्पष्ट झाली...''

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाचपैकी पाच राज्यात पराभव झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यापैकी तीन राज्यांत भाजपने विजय मिळवून दिला होता. भाजपने तीन राज्यांत 65 पैकी 61 जागा जिंकल्या होत्या तर तेलंगणातील सतरापैकी चार जागा जिंकून खाते उघडले होते. मिझोरममध्ये एकमेव लोकसभेची जागा प्रादेशिक पक्षाने जिंकली होती.

काय सांगतो इतिहास

सुमारे वीस वर्षांपूर्वी म्हणजे 2003 मध्ये काय घडले होते. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक भाजपने जिंकली होती. मात्र, त्यानंतर 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी सरकारचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तर 2008 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपने (bjp) पुन्हा विजय मिळवला होता. परंतु 2009 मध्ये काँग्रेसचा पराभव करण्यात अपयश आले होते.

2013 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक काँग्रेसने जिंकली होती. मात्र, त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

मागील 20 वर्षांतील इतिहास पाहता विधानसभा निवडणुकीत विजयी होणाऱ्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत काय होणार व भाजप हा इतिहास बदलणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Narendra modi, Amit Shaha, Priyanka Gandhi, Rahul Gandhi
Assembly Elections Results 2023 : राजस्थान, छत्तीसगडबाबत राहुल गांधींची 'ती' भविष्यवाणी अखेर तंतोतंत खरी ठरली!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com