Assembly Elections Results 2023 : राजस्थान, छत्तीसगडबाबत राहुल गांधींची 'ती' भविष्यवाणी अखेर तंतोतंत खरी ठरली!

Rahul Gandhi News : सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले होते राहुल गांधी?
Rahul Gandhi
Rahul GandhiSakarnama
Published on
Updated on

Assembly Elections Results : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त विजय मिळवला आहे. यामुळे भाजपच्या गोटात सध्या जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे, तर काँग्रेसच्या पराभवामुळे काँग्रेससह काँग्रेसच्या विविध नेत्यांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तसेच, विविध पक्षांच्या नेत्यांसह राजकीय विश्लेषकही मतं व्यक्त करत आहेत. या सगळ्या घडामोडीत आता राहुल गांधींचा एक व्हिडिओदेखील चांगलाच व्हायरल होत आहे.

याचे कारण म्हणजे राहुल गांधींनी राजस्थान, छत्तीसगडबाबत एक विधान जे भविष्यवाणीसारखं म्हणता येईल, ते तंतोतंत खरं ठरलं आहे. राहुल गांधींचा हा व्हिडिओ केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केला आणि म्हटले की, ''राहुल गांधींची भविष्यवाणी खरी ठरली.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi
Election Results: चार राज्यांच्या निकालांनंतर 'राहुल गांधी पनौती है..' हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंडिंगला

व्हिडिओमध्ये नेमकं काय? -

राहुल गांधींचा अवघा दहा सेकंदांचा व्हिडिओ असून, ज्यामध्ये त्यांनी छत्तीसगड आणि राजस्थान निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. ज्यात राहुल गांधी म्हणतात, ''राजस्थानमध्येही सरकार जात आहे आणि छत्तीसगडमध्येही जात आहे.''

आज जे चार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत, त्यामध्येही राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपला यश मिळालं असून, राजस्थान आणि छत्तीसगड काँग्रेसला गमावावं लागलं आहे.

खरंतर राजस्थान निवडणुकीत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पनौती म्हटलं होतं. ज्यावर भाजपने आक्षेप घेत हा मुद्दा उचलून धऱत, निवडणुकीत मुख्य मुद्दा बनवला होता.

Rahul Gandhi
Assembly Elections Results 2023 : तीन राज्यांतील भाजपच्या विजयावर फडणवीस म्हणाले, ''यातून एक गोष्ट स्पष्ट झाली...''

भारत वर्ल्डकप फायनलची मॅच हारल्यानंतर काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ही मॅच पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होते, म्हणूनच भारत हरला ते 'पनौती' आहेत, असं राहुल गांधी म्हणाले होते.

त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जवळपास स्पष्ट होत आला आहे. यामध्ये भाजपने तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर आता सोशल मीडियावर 'राहुल गांधी पनौती है...' हा हॅशटॅग जोरदार ट्रेंडिंगला आला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com