PM Modi in Bengal : ममता बॅनर्जी यांच्या ' माँ, माटी, माणूस'ला धक्का !

PM Modi on Mamata Banerjee : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने संदेशखाली येथील तृणमूल काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शेख शहाजहाँला वाचविल्याबद्दल तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. पश्चिम बंगालमधील महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील नेत्यांच्या चुप्पींवर मोदींनी जोरदार प्रहार केला. इतक्यावर हा मुद्दा थांबला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात या विषयावर भाजप महिला मोर्चाने आंदोलन करत ममता बॅनर्जींचा निषेध केला.
PM Narendra Modi and Mamata Banerjee
PM Narendra Modi and Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे राज्य आहे. या ठिकाणी तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी नेहमी माँ, माटी आणि माणूसचा नारा देत सत्ता संपादित केली. पण, महिलांवर संदेशखाली येथे झालेले अत्याचार आणि त्या अत्याचार प्रकरणात तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी शेख शहाजहाँला वाचविण्याची धडपड तृणमूल काँग्रेसने केली. शेख शहाजहाँला गेल्या पन्नास दिवसांपासून तृणमूलने वाचविले. अखेर त्याला अटक केल्यानंतर तृणमूलने त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित केले. पण, गेल्या दोन महिन्यांपासून धगधगत असलेल्या महिला अत्याचाराच्या या विषयावर इंडिया आघाडीतील एकाही नेत्याने निषेधाचे एक वाक्य काढले नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडिया आघाडीच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी महिलांवर अत्याचाराचे पाढे वाचले जात असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इंडिया आघाडीचे नेत्यांची चुप्पी लाज वाटण्यासारखी असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांप्रमाणे कान, तोंड व डोळ्यावर हात ठेवून इंडिया आघाडी व ममता बॅनर्जी यांनी चुप्पी साधल्याचा आरोप मोदींनी केला.

संदेशखाली हा आता राष्ट्रीय मुद्दा होत चालला आहे. महिलांवरील अत्याचार आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचा थेट सहभाग उघड झाल्यानंतर भाजपने आज संपूर्ण महाराष्ट्रात महिला मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करत ममता बॅनर्जी यांच्या फोटोला चपलांचा हार घालत निषेध नोंदविला. पुढील काळात पश्चिम बंगालमधील संदेशखाली हा लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय मुद्दा म्हणून समोर येऊ शकतो. त्या दृष्टीने भाजपने आज प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करत महिला अत्याचार प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची चुप्पी अधोरेखित केली आहे. इतक्यावर भाजप थांबला नाही तर भाजपने इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी या विषयावर साधलेली चुप्पी समोर आणत त्यांची दुहेरी भूमिका समोर आणली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Narendra Modi and Mamata Banerjee
Devendra Fadnavis News: ...म्हणून शरद पवारांचं आग्रहाचं निमंत्रण फडणवीसांनी नाकारले

भाजपने 17 व्या लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयक आणत लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षणाची घोषणा केली. तेव्हापासून भाजपने महिलांवर अधिक लक्षकेंद्रित करत राजकारण सुरू केले आहे. तत्पूर्वी मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकपासून मुक्ती देत मोदी सरकार महिलांसाठी कसे फायदेशीर आहे, याची जाणीव करून दिली. मोदी सरकारने बचत गटाच्या महिलांसाठी तीन कोटी लखपती दीदी योजना राबवित महिलांसाठी मोदी सरकारचे कार्य अधोरेखित केले आहे. भाजपचे स्टार प्रचारक भविष्यात या तीन मुद्द्यांवर तर लोकसभा निवडणुकीत मते मागतील. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील महिला मुख्यमंत्री असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी संदेशखाली येथील महिला अत्याचार प्रकरणात घेतलेली बोटचेपी भूमिका मतदारांसमोर मांडतील. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांची संदेशखाली प्रकरणातील चुप्पी अधोरेखित करत लोकसभा निवडणुकीत संदेशखाली आणि महिला अत्याचाराचा मुद्दा अधोरेखित करण्याचे संकेत दिले. इतक्यावर भाजप थांबले नाही तर त्यांनी महाराष्ट्रात शहराशहरांत आंदोलन करत हा मुद्दा जिवंत केला आहे. महिला सुरक्षा हा महत्त्वाचा विषय असून, तो लोकसभा निवडणुकीत मुख्य मुद्दा असेल. ममता बॅनर्जी यांच्या दुर्लक्षाचा फटका हा इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत बसू शकतो.

तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शहाजहाँ यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर शेख शहाजहाँ चर्चेत होता. त्यानंतर त्याच्यावर स्थानिक महिलांना शोषणाचा आरोप केल्यानंतर तो फरार झाला होता. या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारच्या ढिसाळ धोरणाबद्दल न्यायालयाने ताशेरे ओढले होते. शेख शहाजहाँला अटक करण्यात पश्चिम बंगाल सरकारने सुरुवातीला दुर्लक्ष केले. महिला अत्याचाराचे प्रकरण देशभरात गाजणे सुरू झाल्यावर नुकतेच शेख शहाजहाँला अटक करण्यात आली, तर तृणमूल काँग्रेसने त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित केले. शेख शहाजहाँ यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या तीन अधिकाऱ्यांवर संदेशखाली परिसरात हल्ला करण्यात आला. त्या प्रकरणात आता त्याची चौकशी तर होईलच. त्याचबरोबर महिला अत्याचाराच्या प्रकरणात शेख शहाजहाँ चांगलाच चर्चेत आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माँ, माटी आणि माणूस या नावाने पश्चिम बंगालमध्ये सत्ता संपादित केली. पण, आता महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत अपयशी महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना पश्चिम बंगालमध्ये या विषयावर फटका बसण्याची चिन्हं आहेत.

R

PM Narendra Modi and Mamata Banerjee
Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी केला ममता बॅनर्जींचा निषेध; मग पदाधिकाऱ्यांना का खडसावले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com