Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी केला ममता बॅनर्जींचा निषेध; मग पदाधिकाऱ्यांना का खडसावले?

Demonstrations against CM Mamata Banerjee and West Bengal Govt : कराड येथे पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात घोषणाबाजी, जवळपास शंभर महिलांची उपस्थिती.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

Karad News : पश्चिम बंगाल येथील संदेशखली येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. याचा भाग म्हणून भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.

पश्चिम बंगालमधील घटनेचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी निषेधाचे बॅनर न आणल्याने चित्रा वाघ चांगल्याच चिडल्या अन् खवळल्याही. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत अर्धा तास थांबून बॅनर आणायला लावले.

कराड (Karad) येथे तृणमूल काॅंग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधार्थ सकाळी 10 वाजता निदर्शने करण्यात येणार होती. यासाठी भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) हजर राहणार असल्याने जवळपास शंभर महिलांनी उपस्थिती लावली होती. तसेच पदाधिकारीही उपस्थित होते. चित्रा वाघ आल्यानंतर कोल्हापूर नाका येथील महात्मा पुतळ्यास अभिवादन करून घोषणा देण्यात आल्या.

Chitra Wagh
Loksabha Election 2024 : अस्तित्व दाखवण्यासाठी 'बीआरएस' लोकसभेच्या मैदानात

भाजपकडून (BJP) उपस्थित महिलांसह चित्रा वाघ घोषणा देण्यासाठी रस्त्यावर उतरल्या, तेव्हा निषेधाचे बॅनर दिसले नाहीत. त्यावर बॅनर कुठे आहेत, असे प्रदेश कार्यकारिणीतील महिलेस विचारले असता त्या गोंधळून गेल्या. बॅनर दिसत नसल्याने चित्रा वाघ चांगल्याच चिडल्या, खवळल्या अन् बॅनर, बॅनर, बॅनर म्हणत चक्क रस्त्याशेजारीच एका कट्ट्यावर ठिय्या मारला. तेथे कार्यकर्त्यांशी बातचीत करेपर्यंत काही वेळात बॅनर आणण्यात आले अन् मगच निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मोर्चाला सातारा जिल्ह्यातून महिला पदाधिकारी आल्या होत्या. यामध्ये नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रहिमतपूरच्या चित्रा कदम, कराडच्या माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कविता कचरे यांच्यासह महिलांनी उपस्थिती लावली. या मोर्चात ममता बॅनर्जी यांची तानाशाही नही चलेगी, असे म्हणत तृणमूल काॅंग्रेसवर हल्लाबोल करण्यात आला.

आरोपी बांगलादेशातील...

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने महिला अत्याचारातील आरोपीला पाठीशी घातले होते. गेल्या 55 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील आरोपीला केवळ भाजपच्या रेट्यामुळे अटक झाली असून, तो बांगलादेशातील असल्याचे महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R

Chitra Wagh
Chandrapur Lok Sabha Constituency : पक्षांतर्गत स्पर्धा प्रतिभा धानोरकरांसह काँग्रेसच्याही मार्गातील अडसर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com