K P Patil : दोन दगडांवर पाय, भरकटलेली राजकीय दिशा, गोंधळलेले कार्यकर्ते, के. पी. पाटलांचं नेमकं चाललंय तरी काय?

Assembly Election k p patil sharad pawar ncp : राष्ट्रवादीतील फूटीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि ए. वाय. पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. तर वेळ आणि काळ पाहून माजी आमदार के पी पाटील यांनी देखील अजित पवार यांना साथ दिली.
K. P. Patil
K. P. PatilSarkarnama
Published on
Updated on

K P Patil News : राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. तर, दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही दगडावर हात ठेवून छाती ठोकपणे 'मी तुमचाच' सांगणारे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राहत असल्याची भूमिका स्पष्ट केल्याने के. पी. पाटील यांची राजकीय दिशा भरकटत चालली आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्ह्याचे राजकारण करत असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आपण राहणार, असे छाती ठोकपणे सांगणारे के. पी. पाटील मात्र विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेणार का? असा सवाल त्यांनी महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर निर्माण झाला आहे.

वास्तविक पाहता महायुतीचे कडवे आव्हान समोर असताना के. पी राजकीय भूमिका दिशाहीन झाल्याने त्यांनाच ती अडथळा ठरण्याची शक्यता आहे. राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन गटात विभागली गेली. त्याचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणात झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेले. तर वेळ आणि काळ पाहून माजी आमदार के पी पाटील यांनी देखील अजित पवार यांना साथ दिली.

K. P. Patil
Bjp Political News : लोकसभेचं 'मिशन 45' फेल; विधानसभेसाठी आता भाजपचं पुन्हा नवं 'टार्गेट' ठरलं !

जिल्ह्याच्या राजकारणात 'मुश्रीफ एके मुश्रीफ' अशी राष्ट्रवादी वाढल्याचा आरोप होत असताना लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बंडखोरी करत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. सद्या त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला राम राम केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ए. वाय. पाटील यांनी टाकलेले पाऊल हे महाविकास आघाडीतून उमेदवारीच्या दृष्टीने घेतले असावे, अशी चर्चा होती.

लोकसभा निवडणुकीत केवळ पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार के पी पाटील हेच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या स्टेजवर होते. तर पडद्यामागून बऱ्याच गोष्टी घडल्या हे निकालानंतर स्पष्ट झाले. तत्पूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार प्रकाश अबिटकर यांची संभाव्य उमेदवारी शिवसेना शिंदे गटातून निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच निर्माण झाल्यानंतर ए. वाय. पाटील यांना उमेदवारीची शक्यता निर्माण झाली असताना माजी आमदार के पी पाटील यांची पाऊले महाविकास आघाडीकडे वळाली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपण जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासोबत असणार, अशी घोषणा माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली होती. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालीच के. पी. पाटील यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळवली. इतकेच नव्हे तर सहकारी कारखान्यावरून लेखापरीक्षणाची मागणी झाल्यानंतर त्यांनी महायुतीत केलेला प्रवेश महत्त्वाचा मानला जाऊ लागला.

मुश्रीफांच्या विरोधात काम करणार?

के. पी. पाटील यांनी शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात जाहीरपणे आपण अजित पवार गटात कधीच गेलो नव्हतो, असे सांगत खळबळ उडवून दिली. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी के. पी. पाटील यांनी जोडण्या लावल्या आहेत. पण असे असताना राज्यस्तरावर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हा बंडखोरांच्या विरोधात पेटला आहे. मात्र माजी आमदार के. पी. पाटील हे त्यांच्या सोयीची भूमिका घेत आहेत हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीमध्ये येत असताना त्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात काम करावे लागणार आहे. हे काम ते करतील का? असा सवाल उपस्थित होत आहे.

'बिद्री'चे कार्यक्षेत्र कागलमध्ये

महाविकास आघाडी सोबत असताना के पी पाटील यांच्यासमोर कळीचे मुद्दे उपस्थित होत आहेत. बिद्री सहकारी कारखाना निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोतोपरी मदत केली. असे असताना कागल विधानसभा मतदारसंघ हा बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो. अशावेळी सभासद आणि कामगारांची बैठक घेऊन मुश्रीफ यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार समरजीत घाटगे यांना मदत करण्याचे जाहीर आश्वासन के पी पाटील देतील का? हा कळीचा मुद्दा त्यांच्यासमोर येणार आहे. शिवाय कागलमध्ये जाऊन घाटगे यांच्या समर्थनात मुश्रीफ यांच्या विरोधात ते प्रचार करू शकतात का?

K. P. Patil
BJP Vs Balasaheb Thorat : '..हे तथाकथित सुसंस्कृतपणाचा बुरखा पांघरून हिंडणाऱ्या थोरातांनी स्पष्ट करावं' ; भाजपने साधला निशाणा!

...तर के.पी. पाटलांना फटका

जर आगामी विधानसभा निवडणुकीला कागलमध्ये येऊन मुश्रीफ यांच्या विरोधात के. पी. पाटील यांनी भूमिका घेतली तर बिद्री सहकारी कारखान्यात पुढील निवडणुकीत मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि सभासद अडचण निर्माण करू शकतात. त्याचा मोठा फटका माजी आमदार के पी पाटील यांना बसू शकतो.

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ए. वाय. पाटील देखील इच्छुक होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांना थांबावे लागले. त्यामुळे आता ए. वाय. पाटील हे के. पी. पाटील यांच्यासाठी थांबण्यास तयार नाहीत. यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यामुळे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर उमेदवारीसाठी सर्वात मोठी अडचण ए.वाय पाटील ठरू शकतात.

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा के. पी. यांना आणि बिद्री कारखाना ए. वाय. पाटलांना असा मध्यमार्ग काढून माघारीसाठी वाटाघाटी ठरल्या असल्याची चर्चा आहेत. मात्र सातत्याने विधानसभा निवडणुकीत ही माजी आमदार के. पी. पाटील यांनी उमेदवारी मिळवली. इतकेच नव्हे तर बिद्री स्वतःकडे राहण्यासाठी त्यांनी ए वाय पाटील यांना डावलले. त्यामुळे सर्वच आपल्याला या भूमिकेमुळे नुकत्याच पार पडलेल्या बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत ए. वाय. पाटलांनी विरोधकांना साथ दिली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडे माजी आमदार के. पी. पाटील यांची पाऊले वळाली आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचा राजकीय भूमिकेचा फटका के पी पाटील यांना बसू शकतो. सततच्या बदलत्या भूमिकेमुळे त्यांची राजकीय दिशा भरकट चालली आहे. आज एक तर उद्या दुसरी भूमिका त्यांची राहिली तर आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल यात शंका नाही.

(Edited By Roshan More)

K. P. Patil
Amruta Fadnavis : 'देवेंद्रजी रोमँटिक नाहीत', अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com