Rahul Gandhi Opposition Leader : गांधी घराण्याची 'अशी'ही हॅटट्रिक! आई - वडिलांनंतर आता मुलगाही विरोधी पक्षनेता..!

Rajiv Gandhi- Sonia Gandhi- Rahul Gandhi News : मोदी सरकारच्या 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 या दोन्ही कार्यकाळात म्हणजे गेली दहा वर्षांत लोकसभेला विरोधी पक्षनेताच नव्हता.
Rahul Gandhi - Sonia Gandhi - Rajiv Gandhi
Rahul Gandhi - Sonia Gandhi - Rajiv Gandhi Sarkarnama

Rahul Gandhi Political News : 2014 पासून रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीत बसण्याचा मान अखेर कॉँग्रेसला मिळालाच. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात ही खुर्ची रिकामी पडली होती. 18 व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड झाल्यानं आधी वडील (राजीव गांधी), नंतर आई (सोनिया गांधी) आणि आता त्यांचा मुलगा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची या पदी वर्णी लागली आहे.

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर त्यांनी 18 व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांना मान्यता दिली. कॉंग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा केली. आधी वडील मग आई आणि आता मुलगाही विरोधी पक्षनेता झाला.

याआधी काँग्रेसकडून शेवटच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी काम पाहिलं. 1999 ते 2004 या काळात त्या विरोधी पक्षनेत्या राहिल्या. 2009 ते 2014 या काळात भाजप नेत्या सुषमा स्वराज विरोधी पक्षनेत्या राहिल्या होत्या. 2004 ते 2009 या काळात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी विरोधी पक्षनेते राहिले. त्यानंतर मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात हे पद रिकामंच राहिलं. विशेष म्हणजे राजीव गांधी देखील 18 दिसंबर 1989 ते 24 दिसंबर 1990 या काळात विरोधी पक्षनेते राहिले होते.

तब्बल दहा वर्षांनी लोकसभेला मिळाला विरोधी पक्षनेता!

मोदी सरकारच्या 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 या दोन्ही कार्यकाळात म्हणजे गेली दहा वर्षांत लोकसभेला विरोधी पक्षनेताच नव्हता. भाजपला 2014 आणि 2019 या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीत अनुक्रमे 282 आणि 303 इतक्या बहुमताहून (272) अधिक जागा मिळाल्या होत्या तर विरोधी पक्षाला (कॉंग्रेस) या दोन्ही निवडणुकीत अनुक्रमे 44 आणि 52 इतक्या कमी जागा मिळाल्या होत्या.

Rahul Gandhi - Sonia Gandhi - Rajiv Gandhi
Shadow PM Rahul Gandhi : राहुल गांधींना का म्हटलं जाईल ‘शॅडो PM’? मोदींनी शपथ घेतलेल्या दिवसापासून मिळणार मान...

लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 10 टक्के म्हणजे 55 जागा मिळाल्यास विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता नेमता येतो मात्र दोन्ही निवडणुकीत विरोधी पक्षाला 55 हा आकडाही गाठता आला नव्हता. 2024 च्या निवडणुकीत मात्र विरोधी पक्षातील कॉंग्रेसला सर्वाधिक म्हणजे 99 इतक्या जागा मिळाल्यानं कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता आला.

एकूणच काय तर आधी वडील (राजीव गांधी), मग आई (सोनिया गांधी) आणि आता मुलगा राहुल गांधी हे देखील विरोधी पक्षनेते झाल्यानं गांधी घराण्याची विरोधी पक्षनेतेपदाची हॅटट्रिक असंच म्हणावं लागेल.

(Edited By Deepak Kulkarni)

Rahul Gandhi - Sonia Gandhi - Rajiv Gandhi
Sandeep Kshirsagar Vs Jaidatta Kshirsagar: जयदत्त क्षीरसागर शरद पवार गटाच्या संपर्कात..? आमदार क्षीरसागर म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com