संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्‍लीन चीटचा विधान परिषदेत निषेध 

संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्‍लीन चीटचा विधान परिषदेत निषेध 

मुंबई : भीमा कोरेगाव घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना दिलेली क्‍लीन चिट देणे हे आक्षेपाहार्य असल्याचा आरोप आमदार जोगेंद्र कवाडे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन च्या माध्यमातून केला. तर या विषयाबाबत बोलण्यासाठी सभापतींनी परवानगी नाकारल्याने आमदार जयदेव गायकवाड यांनी निषेध करीत सभात्याग केला. 

भिंडेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेला खुलासा चुकीचा आहे, कोणत्याही प्रकारचे पुरावे न तपासता क्‍लीन चिट देणे ही तर भयंकर गंभीर बाब असल्याचा आरोप कवाडे यांनी विधान परिषदेत केला. त्यावेळी बोलताना सभागृह नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचा चुकीचा अर्थ लावला आहे, या प्रकरणात भिडेंना कुठलीही क्‍लीन चिट दिलेली नाही, पुरावे तपासून निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री बोलले होते असा खुलासा पाटील यांनी केला आहे. त्यावर संतापलेले सदस्य जनार्धन चांदूरकर यांनी सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप केला. तर या प्रश्वावर आपल्याला बोलण्यासाठी संधी मिळावी अशी मागणी जयदेव गायकवाड यांनी केली. त्यावर उपसभापतींनी बोलण्याची संधी नाकारल्याने त्यांनी निषेध नोंदवित सभात्याग केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com