Samruddhi Mahamarg Scam: सत्ता महायुतीची असो किंवा महाविकास आघाडीची सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावर कायमच सत्ताध्याऱ्यांची मेहेरनजर होती. समृद्धी महामार्गात (Samruddhi Mahamarg) त्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
मोपलवार यांना राजकीय वरदहस्तामुळे निवृत्तीनंतरही त्यांना मुदतवाढ का देण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मोपलवारांना मुदतवाढ देण्यात आली होती.
सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील असलेल्या मोपलवार यांना निवृत्तीनंतरही तब्बल सात वेळा अशी विक्रमी मुदतवाढ देण्यात आली होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू प्रशासकीय अधिकारी म्हणून राधेश्याम मोपलवार यांची ओळख आहे, हे नवीन सांगण्याची गरज नाही.
समृद्धी महामार्ग कशा पद्धतीने भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता आणि कोणी, कशा जमिनी घेतल्या, त्या कोणाला विकल्या, असा प्रश्न करीत रोहित पवार यांनी खळबळ उडवून दिली. समृद्धी महामार्गाच्या कामाची निविदा आणि थेट आकडेवारीच रोहित पवार यांनी सांगितली आहे.
2018 मध्येच मोपलवार हे निवृत्त झाले होते, पण निवृत्तीनंतरही त्यांना तब्बल सात वेळा अशी विक्रमी मुदतवाढ देण्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा काय उद्देश होता, अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक का करण्यात आली नाही, मोपलवारचं का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहेत.
मोपलवार हे मूळचे नांदेडचे असून, ते 1995 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कोकण आयुक्त या पदांसह अनेक महत्त्वाची खाती सांभाळली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांना हटवण्यात आलं होते.
मोपलवार यांची संपूर्ण प्रशासकीय सेवा ही एक वादग्रस्त अधिकारी म्हणून कायम चर्चेत राहिली.
राधेश्याम मोपलवार यांच्यावर 2017 मध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.
भ्रष्टाचाराची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती.
त्यांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
मोपलवारांच्या चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली होती.
समितीने क्लीन चिट दिली आणि त्यांना डिसेंबर 2017 मध्ये पुन्हा सेवेत घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.