
Mumbai News : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत 31 ऑगस्टला संपली. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या पदासाठी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत रस्सीखेच पाहावयास मिळत होती. मात्र, काँग्रेसच्या नेत्याच्या शिष्टमंडळाने मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी दोन्ही पक्षातील नेटमंडळीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी महाविकास आघाडीत ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करून देण्यात आली. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी लगेचच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला सोडविण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला.
दहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठ्या फरकाने विजय मिळवत महायुती सत्तेत आली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुफडासाफ झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेस या तीन पक्षाला मिळून 50 ही विधानसभेच्या जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दहा महिन्यापासून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. त्या पदासाठी गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीने फिल्डिंग लावली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ महाविकास आघाडीतील तीन पक्षापैकी कोणत्याही एका पक्षाकडे नाही. त्यामुळे गेल्या एकही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यासाठी हे पद सोडण्यात यावे, अशी मागणी लावून धरली आहे. मात्र, संख्याबळाअभावी हे पद देण्यासाठी महायुती सरकारकडून दिरंगाई केली जात आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षाने संख्याबळानुसार पदासाठी फॉर्म्युला ठरवला आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद, तर काँग्रेसकडे (Congress) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद, तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभेचे उपसभापतीपद देण्याचे ठरले होते. मात्र, सत्ताधारी पक्षाने विधानसभेचे उपसभापतीपद विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी सोडले नाही. त्याजागी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांची वर्णी लागली.
दुसरीकडे आता केवळ विधानसभा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहेत. त्यामुळेच काँग्रेस व युदहव ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन्ही पदे वाटून घेतली आहेत. त्यानुसार आता विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्यात येणार आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे देण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे त्याची आठवण सोमवारी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अमीन पटेल यांनी सोमवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची यांच्या भेटीवेळी करून दिली.
त्यामुळे आता येत्या काळात ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद राहणार आहे. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंसोबत ही डिल केली आहे? त्यामुळे ठाकरे यांनी ही डील मान्य केली आहे. त्यानुसार आता येत्या काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर असून येत्या काळात त्यांना लाल दिवा मिळणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.