औरंगाबाद : सिल्ल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या डोक्यावर आणखी पाच वर्ष तरी केस उगवण्याची शक्यता नाही अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्तारांना टोला लगावला. आज मुंबईत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती, त्या टीकेला उत्तर देतांना दानवेंनी सत्तार यांनी घेतलेल्या जुन्या शपथेची आठवण पत्रकारांना करून दिली.
दानवे यांनी गोहत्येसंदर्भात केलेले विधान आणि त्यावरून उठलेले रान याचा संदर्भ देत "जो माणूस मतांसाठी आपलं हिंदुत्व डावाला लावतो, त्या व्यक्तीला निवडून देऊन आमची चूक झाली अशी भावना दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघातील लोकांची झाली आहे, पुढच्यावेळी आम्ही ही चूक दुरूस्त करू' अशा शब्दांत लोक दानवे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत असल्याचे सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करतांना प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले होते.
त्यावर आज रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना सत्तार यांना प्रत्युत्तर दिले. दानवे म्हणाले, जोपर्यंत रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही तोपर्यंत डोक्यावर केस उगवू देणार नाही अशी शपथ घेत त्यांनी डोक्यावर गांधी टोपी घातली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत मी विजयी झाल्याने आणखी पाच वर्ष तरी त्यांच्या डोक्यावर केस उगवण्याची शक्यता नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.