Suhas Diwase Vs Jogendra Katyare : कट्यारेंची 'नाराजी'ची कट्यार; पत्रातून थेट 'कलेक्टरां'वर वार!

Pune Collector : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचं 'वजन' वाढताच पुण्याचे 'कलेक्टर' सुहास दिवसेंवर त्यांच्याच 'टीम'मधील प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra Katyare
Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra KatyareSarkarnama

Pune News : पुण्याचे 'कलेक्टर' सुहास दिवसेंमुळं माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलीये, अशा मजकुराचा लेटर बॉम्ब टाकून खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी खळबळ उडवून दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या तोंडावर दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानं राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

'राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून कलेक्टर माझा मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. कोण आहेत ते आमदार? आणि कट्यारेंनी आपल्या नाराजीच्या कट्यारीतून कलेक्टरांवर का केला वार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचं 'वजन' वाढताच पुण्याचे 'कलेक्टर' सुहास दिवसेंवर त्यांच्याच 'टीम'मधील प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

'राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून सुहास दिवसे माझा मानसिक छळ करत आहेत. दिवसेंच्या त्रासामुळं माझ्यावर आत्महत्येची वेळ आल्याचे पत्रच कट्यारेंनी थेट राज्याचे मुख्य सचिव आणि निवडणूक आयोगाला धाडले आहे.

Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra Katyare
Lok Sabha Election 2024 Result : वेळ ठरली! बारामती, पुणे, शिरूर अन् मावळात कुणाचं वर्चस्व.. दुपारपर्यंतच होणार स्पष्ट

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते Dilip Mohite Patil आणि दिवसे हे आपल्याला ठरवून त्रास देत असल्याचेही कट्यारेंनी आरोप केला आहे. आमदार मोहिते यांची कामे करत नसल्यानेच ही वेळ आपल्यावर आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे रिंग रोड कामाबाबत चौकशी समिती लावून या चौकशीत आपणास गुंतवून ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची चुकीची कामं आणि आर्थिक मागणी पूर्ण करत नसल्याने माझ्याविरोधात वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. आता हे सर्व सहन होत नसल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे कट्यारेंनी पत्रात नमूद केले आहे.

कट्यारे आणि दिवसे हा अधिकाऱ्यांमधील वाद आता मीडियावर व्हायरल होत असतानाच त्यात आपलं नाव घेण्यात आल्यानं आमदार दिलीप मोहिते देखील आता चांगलेच संतापले आहेत. मोहितेंनी या वादावर जोरकस प्रतिक्रिया दिल्यानं दिवसे-कट्यारे वादाला राजकीय फोडणी मिळाली.

'भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आपण कायम आवाज उठवतो. अशा लोकांची चौकशी झालीच पाहिजे. आता 'दूध का दूध और पानी का पानी होऊनच द्या, अशा शब्दांत चॅलेंज करत मोहितेंनी अधिकाऱ्यांमधील वाद पेटवण्याचा प्रयत्न केला. आपण दिवसेंना काहीच सांगितलं नसून कट्यारेंविरोधात काही करण्याचा माझा अजिबात संबंध नसल्याचे आमदार मोहितेंनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कट्यारे यांनी या पत्रातून दिवसे आणि मोहिते पाटलांबाबत तक्रारींचा पाढाच वाचल्याने जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकी वर्तुळात खळबळ उडाली. आता कलेक्टर दिवसेंविरोधातील तक्रारींवर महसूल खात्याचे मुख्य सचिव काय भूमिका घेणार शिवाय त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसे आणि कट्यारे यांच्या वादावर काय बोलणार, हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Dilip Mohite Patil, Suhas Diwase, Jogendra Katyare
Shashikant Shinde Big Statement : शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट; साताऱ्यातील आमदाराकडून डॉ.तावरेची शिफारस...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com