Vidhansabha Election Flashback 2004 : नंबर एकचा पक्ष ठरला राष्ट्रवादी, मुख्यमंत्री झाला काँग्रेसचा!

Maharashtra Vishan Sabha Election : 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती यांच्यात मुख्य लढत झाली.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : 1999 मध्ये युतीचं सरकार जाऊन महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं आणि विलासराव देशमुख त्या आघाडी सरकारचे पहिले मुख्यमंत्री बनले.

परंतु, 2004 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एक वर्षे अगोदरच विलासरावांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमवावी लागली आणि त्यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे Sushilkumar Shinde महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. 2004 च्या निवडणुकीचा रणसंग्राम अखेर सुरू झाला आणि 57 पक्षांसह 1083 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले.

57 पक्ष, 1083 अपक्ष उमेदवार!

2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती यांच्यात मुख्य लढत झाली. एकूण 57 पक्षांसह 1083 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. काँग्रेसनं 157 तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 124 जागा लढवल्या. शिवसेनेनं 163 तर भाजपनं 111 जागा लढवल्या. या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्ष आणि रिपाइं (आठवले गट) असे दोन पक्ष पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले. या दोन्ही पक्षांनी अनुक्रमे 19 व 20 जागा लढवल्या. अखेर निकाल लागला.

राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या, काँग्रेस, भाजप, सेनेच्या घटल्या

राष्ट्रवादीनं 71 जागा जिंकल्या, काँग्रेसनं 69. मागच्या म्हणजे 1999 च्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या तब्बल 13 जागा वाढल्या पण काँग्रेस 75 वरून 69 वर आली. काँग्रेसच्या 06 जागा घटल्या. 71 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातला सर्वांत मोठा पक्ष ठरला. तिकडं शिवसेना-भाजप युतीची पडझड झाली. शिवसेनेनं 62 तर भाजपनं 54 जागा जिंकल्या. 1999 च्या तुलनेत शिवसेनेच्या 07 तर भाजपच्या 02 जागा घटल्या.

Sharad Pawar
Babanrao Shinde : बबनराव शिंदेंचा डीएनए गद्दारीचा! शरद पवार गटाच्या नेत्याने इतिहासच सांगितला...

पप्पू कलानी चौथ्यांदा, अरुण गवळी पहिल्यांदा आमदार

पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढलेल्या रिपाइं आठवले गटाकडून उभे राहिलेले पप्पू कलानी निवडून आले. ते सलग चौथ्यांदा आमदार बनले. उल्हासनगर मतदारसंघातून 1990, 1995, 1999 आणि 2004 असे चार वेळा ते निवडून आले.

1990 ला काँग्रेसकडून, दोनदा अपक्ष आणि या निवडणुकीत रिपाइं आठवले गटाकडून जिंकले. जनसुराज्य शक्ती पक्षानही आपल्या पहिल्याच निवडणुकीत चांगली कामगिरी केली. 19 जागा लढवल्या आणि त्यातल्या 04 जिंकल्या.

अखिल भारतीय सेनेकडून निवडणूक लढलेले अरुण गवळी Arun Gawali देखील पहिल्यांदा आमदार बनले. त्यांनी चिंचपोकळी येथून निवडणूक लढवली. सपनं 95 तर बसपनं 272 जागा लढवल्या पण या दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही.

या निवडणुकीत एकूण 57 पक्षांपैकी 11 पक्षांना जागा जिंकता आल्या. त्यातील 46 पक्षांच्या हाती भोपळा लागला तर 1083 अपक्षांपैकी 19 जण आमदार बनले. 1999 च्या तुलनेत अपक्ष निवडून येण्याच्या संख्येत 07 नं वाढ झाली.

इतर काही पक्षांनी जिंकलेल्या आणि लढवलेल्या जागा

शेकाप - विजयी - 02 - लढवलेल्या जागा - 43

भारिप - विजयी - 01 - लढवलेल्या जागा - 83

स्वतंत्र भारत पक्ष - विजयी - 01 - लढवलेल्या जागा - 07

माकप - विजयी - 03 - लढवलेल्या जागा - 16

राष्ट्रवादीपेक्षा दोन जागा कमी तरी काँग्रेसचा मुख्यमंत्री!

2004 च्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 71 जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला. काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. आता मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार असं स्पष्ट दिसत असतानाच मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी Sharad Pawar मात्र मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आपल्या पक्षाकडं ठेवत काँग्रेसला मुख्यमंत्रिपद सोडलं आणि विलासराव देशमुख दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

2004 च्या निवडणुकीपूर्वी एक वर्षे अगोदर त्यांना ही खुर्ची सोडावी लागली होती. पुढं मात्र मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं विलासराव देशमुखांना पुन्हा एकदा आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे डिसेंबर 2008 मध्ये मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमवावी लागली आणि अशोक चव्हाण Ashok Chavan मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत जाऊन बसले.

पुढील भागात विधानसभा फ्लॅशबॅक : 1999

Sharad Pawar
Congress News : काँग्रेसच्या बैठकीला बोलावले जात नाही; हायकमांडकडे आमदार झिशान सिद्दिकी करणार तक्रार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com