Babanrao Shinde : बबनराव शिंदेंचा डीएनए गद्दारीचा! शरद पवार गटाच्या नेत्याने इतिहासच सांगितला...

Sharad Pawar And Baban Shinde Meeting : पुण्यातील शरद पवार - बबनराव शिंदेंच्या भेटीनंतर माढ्यातील राजकारण तापले
Sharad Pawar, Baban Shinde
Sharad Pawar, Baban ShindeSarkarnama
Published on
Updated on

Madha Political News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी रविवारी आपले चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार गटाचेच माढ्यातील नेते संजय कोकाटे यांनी बबन शिंदे यांच्यावर डीएनए काढत जोरदार टीका केली.

बबनराव शिंदेंचा इतिहास गद्दारीचा असल्याची टीका कोकाटेंनी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यातील राजकीय वातावरण चांगलेच चिघळणार असल्याचे दिसत आहे.

संजय कोकाटे म्हणाले, आपल्या माढ्या विधासभेचे आमदार बबनदादा शिंदे आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांना घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेले. बबनराव शिंदे यांचा डीएनए गद्दारीचा आहे. सुरूवातीला मोहिते पाटलांकडून ताकद घेतली त्यांच्याशी गद्दारी केली.

पवार साहेबांकडून Sharad Pawar सगळे कारखाने काढून घेतले, अन् गद्दारी केली. ईडीची नोटीस थांबवण्यासाठी पाय धरून भाजपला नादाला लावले, त्यांच्याशी गद्दारी केली. माढा तालुक्यातील जनतेशी ते 30 वर्षे गद्दारी करतात. आज पुन्हा एकदा अजितदादांशी गद्दारी करून ते त्यांनी सिद्ध केले.

मात्र आता बबनराव शिंदे Bababrao Shinde फिरत असताना, एकतर तुतारी हातात घ्या, नाही तर अपक्ष लढा. तुम्ही भाजपसोबत जाऊ नका, असे माढ्यातील लोक त्यांना सांगत आहेत. त्यानुसार आज त्यांनी पवारांच्या पायाशी लोळण घेतले. कारण काय तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पुत्राला जनतेवर थोपवायचे आहे, असा टोलाही कोकाटेंनी लगावला.

Sharad Pawar, Baban Shinde
Solapur Politics : बबनदादांनी टायमिंग साधलं; फडणवीस माढ्यात असतानाच पवारांच्या भेटीसाठी पुणे गाठले!

वयाच्या 84 व्या वर्षी आपल्या नेत्याला दुखावले. आज महिनाही झाला नाही त्यांना टोकाचा विरोध केला. लोकसभेला जिवापाड विरोध करताना पैशांचा पाऊस पाडला. त्यानंतर ते पुन्हा त्यांच्याकडेच गेले. मात्र पवारांच्या केबीनमधून बाहेर येताना ते तोंड लपवून आले. आपले भैया तर तोंडात चप्पल मारल्यासारखे तोंड लपवत होते. एखाद्या नेत्याने तिरके पाहिले तरी आम्ही कुणाकडे जात नाही. मात्र हे निर्लज्ज आहेत, अशा शब्दात कोकाटेंनी शिंदेंचा समाचार घेतला.

प्रत्येक पक्षात जाऊन लाभार्थी व्हायचे आणि त्यानंतर गद्दारी करायची अशी त्यांची वृत्ती आहे. त्यांना आता शिक्षा व्हायची वेळ आलेली आहे. त्याने तुमच्या पैशावर फक्त स्वतःचा व्यवसाय करून तुमच्यावरच उपकार केल्याचे दाखवले आहे. आता बबन शिंदे भविष्यात अनेक सोंग, नाटके करतील. तुम्हाला भावनाविवश करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र तु्म्हा या ढोंगी माणसावर विश्वास ठेवू नका. हा माणूस अजितबात विश्वासार्ह नाही, असा हल्लाबोलच कोकाटेंनी केला.

Sharad Pawar, Baban Shinde
Ajit Pawar NCP : सगळ्यांनाच आमदार व्हायचंय; पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांना शहराध्यक्ष मिळेना..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com