Sheikh Hasina : ग्रेनेड स्फोटातून वाचलेल्या वंगबंधूंच्या कन्येला दुसऱ्यांदा सोडावा लागला देश

Sheikh Hasina Resigns and left Bangladesh : बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धत बंद करावी, या मागणीसाठी सुरू झालेले आंदोलन चिघळले. हिंसाचार, जाळपोळ झाली. यात जवळपास 100 जणांचा जीव गेला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पंतप्रधान शेख हसीना यांना अखेर राजीनामा देऊन देश सोडावा लागला आहे.
Sheikh Hasina Resigns and left Bangladesh
Sheikh Hasina Resigns and left Bangladesh Sarkarnama
Published on
Updated on

Sheikh Hasina Resigns : अलीकडच्या काळात दोन महिलांच्या भोवतीच बांगलादेशचे राजकारण फिरत राहिले आहे. 1991 मध्ये बांगलादेशी नॅशनॅलिस्ट पार्टीच्या बेगम खालेदा झिया या पंतप्रधान बनल्या. त्या बांगलादेशच्या (Bangladesh) पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या.

दुसऱ्यांदा 2001 ते 2006 दरम्यान त्या बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या होत्या. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या, बांगलादेशचे संस्थापक वंगबंधू शेख मुजीबुर रहमान (Sheikh Mujibur Rahman) यांच्या कन्या शेख हसीना या 1996 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनल्या होत्या.

आरक्षणाच्या विरोधात बांगलादेशातील हिंसाचार, जाळपोळ नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे राजीनामा देऊन त्यांनी देश सोडला आहे. बांगलादेश (Bangladesh) हा पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा. 1971 मध्ये पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. ताजुद्दीन अहमद पहिले पंतप्रधान बनले. त्यानंतर शेख मुजीब, मोहम्मद मंसूर अली, मशीहूर रहमान, शाह अजीजुर रहमान, अताउर रहमान खान, मिजानुर्ऱहमान चौधरी, मौदूद अहमद, काजी जफर अहमद हे पंतप्रधान बनले.

1991 मध्ये बेगम खालिदा झिया या पंतप्रधान बनल्या. त्यानंतर 2001 मध्येही त्या पंतप्रधान बनल्या. 1996 ते 2001 दरम्यान शेख हसीना पंतप्रधान राहिल्या. त्यानंतर 2009 ते पायउतार होईपर्यंत म्हणजे 5 ऑगस्ट 2024 पर्यंत त्याच पंतप्रधान होत्या. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेश गेल्या काही दिवसांपासून धुमसत आहे. नोकऱ्यांतील आरक्षण रद्द करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.

Sheikh Hasina Resigns and left Bangladesh
Sheikh Hasina Resigns : मोठी बातमी! शेख हसीना भारतात दाखल, पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा

शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा द्यावा, या मागणीनेही जोर धरला होता. लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी शेख हसीना यांना राजीनाम्यासाठी अल्टिमेटम दिला होता. राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना या भारतात दाखल झाल्या असून, येथून त्या लंडनला जातील अशी शक्यता आहे.

शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 1947 रोजी ढाक्यात झाला. बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या हसीना हे पहिले अपत्य. विद्यार्थी नेत्या म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. शिक्षण घेत असताना ढाका विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेत सक्रिय होत्या. त्यानंतर त्यांनी आवामी लीग या त्यांच्या पक्षाच्या विद्यार्थी आघाडीची जबाबदारी स्वीकारली.

Sheikh Hasina Resigns and left Bangladesh
Bangladesh Protest : बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, 91 जणांचा मृत्यू; भारतीय विद्यार्थ्यांना सतर्कतेचं आवाहन

वडील आणि तीन भावंडांची हत्या

वडील आणि तीन भावंडांची हत्या झाल्यानंतर शेख हसीना यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शेख मुजीबुर रहमान यांच्याविरोधात लष्कराने बंड केले होते. त्यावेळी झालेल्या संघर्षात शेख हसीना यांचे वडील, तीन भावंडांची हत्या करण्यात आली होती. शेख हसीना, त्यांचे पती वाजिद मियाँ आणि त्यांच्या एका लहान बहिणीचा जीव वाचला होता.

इंदिरा गांधींशी चांगले संबंध

वडिलांची हत्या झाल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतला होता. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. काही वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर त्या 1981 मध्ये त्या मायदेशी परतल्या आणि पक्षाची धुरा हाती घेतली होती. 1986 ते 1990 आणि 1991 ते 1996 पर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहिले. 1996 मध्ये त्या पहिल्यांदा पंतप्रधान बनल्या.

ग्रेनेडच्या स्फोटाद्वारे हत्येचा प्रयत्न

त्यानंतर 2009 पासून त्या 2024 पर्यंत सलग पंतप्रधान राहिल्या. तत्पूर्वी, 2004 मध्ये एका सभेत ग्रेनेडच्या स्फोटाद्वारे त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातून त्या बचावल्या होत्या. 2009 मध्ये सत्तेत येताच त्यांनी 1971 च्या युद्ध गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी ट्रिब्यूनल स्थापन केले. त्याद्वारे विरोधी पक्षांतील काही हाय प्रोफाइल नेत्यांना त्यांनी दोषी ठरवले होते. त्याच्याविरोधात हिंसाचार झाला होता.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेश गेल्या काही महिन्यांपासून धुमसत आहेत. हिंसाचार, जाळपोळ सुरू आहे. याच आतापर्यंत जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंणात येण्याऐवजी वरचेवर चिघळत आहे. विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. बांगलादेशते संस्थापक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे शेख हसीन यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. त्यांनी देश सोडला आहे. त्या भारतात आल्या असून, येथून त्या लंडनला जातील, अशी शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com