Bangladesh News : बांगलादेशात आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये पुन्हा हिंसाचार झाले. रविवारी झालेल्या संघर्षात 91 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या चकमकीत डझनभर लोक जखमीही झाले.
या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशात आपल्या नागरिकांना संपर्कात राहण्यास आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यासाठी भारताच्या सहाय्यक उच्चायुक्ताने +88-01313076402 आपत्कालीन क्रमांक जारी केला.
बांगलादेशातील आरक्षण प्रणालीत 1971 मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील निदर्शनांनी रविवारी पुन्हा जोर धरला.
पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचा मागणी लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशात पोलिस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 200 हून अधिक लोक मारले गेले होते.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सरकारच्या राजीनाम्याच्या मागणी आणि असहकार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आंदोलक जमा झाले होते. त्यावेळी आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांत चकमक सुरू झाली. यात तब्बल ९१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने सांयकाली सहापासून देशभरात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू केला आहे.
बांगलादेशात निषेधाच्या नावाखाली तोडफोड करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी असल्याचा आरोप पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. देशातील सुरक्षेबाबत शेख हसीना यांनी राष्ट्रीय समितीची बैठक बोलावली. त्यावेळी लष्कर, नौदल, हवाई दल, पोलिस आणि इतर यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रंगपूरमध्ये चार अवामी लीग समर्थक ठार झाले, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. तर बोगरा आणि मागुरा येथे प्रत्येकी दोन जण ठार झाले, त्यात एका विद्यार्थी गटाच्या नेत्याचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.