Shirish Chaudhary: गुलाबराव पाटलांची ताकद वाढणार; माजी आमदाराचा 25 नगरसेवक, 100 सरपंचांसह शिवसेनेत प्रवेश

Former Amalner MLA Shirish Chaudhary joins Shiv Sena: नंदुरबारचे सुपुत्र आणि अमळनेर विधानसभेचे माजी आमदार असलेले शिरीष चौधरी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत.
Gulabrao Patil News
Gulabrao Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

राजकीय डावपेच आखण्यात तरबेज असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना थेट शह देण्यासाठी जळगाव जिल्ह्यात शिंदे गटानेही हालचाली सुरु केल्या आहेत. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी शिवसेनेच्या गळाला लागले आहेत.

आज ते मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाय निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत 25 नगरसेवक, 100 सरपंचदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारानं हा पक्षप्रवेश होत असल्याचे समजते.

नंदुरबारचे सुपुत्र आणि अमळनेर विधानसभेचे माजी आमदार असलेले शिरीष चौधरी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत. अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले शिरीष चौधरी यांनी नंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा दिला होता.

स्थानिक भाजप नेत्यांकडून कार्यकर्त्यांची कामे केली जात नसल्याने आणि त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल होत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. त्यांच्यासोबत अमळनेर, नंदुरबार, तळोदा आणि शहादा येथील 25-30 नगरसेवक, 50-100 सरपंच आणि इतर पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अमळनेर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे.

Gulabrao Patil News
Ajit Pawar: मुरलीअण्णांना पुढे जाऊ द्या! अजितदादांच्या साम्राज्यावर भाजपचा दावा

भाजपने २०१९ मध्ये त्यांना अमळनेरमधून विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी ते पराभूत झाले होते. 'भाजपच्या काही लोकांनीच गद्दारी केल्याने मी पराभूत झालो होतो,' असा आरोप चौधरी यांनी केला होता. तेव्हापासून ते अपक्ष निवडणूक लढत आहेत.

Gulabrao Patil News
Pune ZP election 2025: पूर्व हवेलीत महिलांचे वर्चस्व; आरक्षणामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून चौधरी ओळखले जातात.

  • २०१४ मध्ये पहिल्यांदा अमळनेरमधून अपक्ष निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर चौधरी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.

  • २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली.तेव्हा राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

  • २०२४ च्या निवडणुकीत अमळनेरची जागा अजित पवार गटाला सोडण्यात आल्याने चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली. त्यांना पराभव पत्करावा लागला.

  • महायुतीच्या उमेदवाराला अनिल पाटील यांना आव्हान दिल्यानंतर चौधरी भाजपपासून काही दिवस लांब गेले होते.

  • मुख्यमंत्री फडणवीस फेब्रुवारीत जळगाव दौऱ्यावर आले असता, त्यांची भेट घेऊन चौधरी यांनी मनोमिलनाचा प्रयत्न करून पाहिला.

  • भाजपकडून त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचे आता निश्चित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com