Pune Politics: निकालापूर्वीच पुण्यात सेलिब्रेशन सुरू; सुळे, धंगेकर, कोल्हेंच्या विजयाचे बॅनर झळकले!

Maharashtra Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूर लोकसभेच्या उमेदवार अमोल कोल्हे यांचे छायाचित्र असलेले बॅनर झळकले आहेत.
Pune Politics
Pune PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यात आले, त्यानंतर आता महाआघाडीच्या उमेदवारांचे खासदार म्हणून अभिनंदन करणारे फलक पुण्यात झळकले आहेत. पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये आबा बागुल मित्र परिवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे विजयी पोस्टर लावले आहेत. अमित बागुल यांनी हे बॅनर लावले आहे.

बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule), पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरुर लोकसभेच्या उमेदवार अमोल कोल्हे यांचे छायाचित्र असलेले बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर मात्र मावळ लोकसभेच्या आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा फोटो गायब असल्याचे दिसले. निकालापूर्वीचे लागलेले हे बॅनर पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

Pune Politics
Chitra Wagh Vs Sushma Andhare: सुषमा अंधारे सटर-फटर नेत्या; चित्रा वाघांचा हल्लाबोल

पुणे, शिरुर, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. 4 जून रोजी त्याचा निकाल लागणार आहे. पण त्या आधीच काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे.

महायुती- महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचे खासदार या आशयाचे बॅनर्स पुण्यात झळकल्यानंतर आघाडीनेही सुळे, धंगेकर, कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. कार्यकर्त्यांनी निकालाआधीच सेलिब्रेशन सुरू केल्याची चर्चा पुण्यात सुरु आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com