अमित शहा विरुद्ध संजय राऊत... थेट पहिला सामना दादरा नगर हवेलीतून!

देशात काहीच काम बाकी नाही, त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्री पाच दिवसापासून येथे बसले आहेत.
Sanjay Raut, Amit Shah
Sanjay Raut, Amit Shahsarkarnama
Published on
Updated on

सिल्वासा : दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कलाबेन डेलकर (Kalaben Delkar) यांना शिवसेनेने (ShivSena) उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज (ता. १६ ऑक्टोबर) दादरा नगर हवेलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजवर जोरदार टीका केली. (ShivSena MP Sanjay Raut criticizes BJP)

Sanjay Raut, Amit Shah
मुंबईची नाही पण दुसऱ्या पालिकेची तावडेंवर मोठी जबाबदारी!

संजय राऊत दादरा नगर हवेलीती सिल्वासामध्ये बोलत होते, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई त्यांच्या सोबत होते. या वेळी राऊत म्हणाले, दादरा नगर हवेली अजूनही पारतंत्र्यात आहे. सिल्वासामध्ये प्रवेश केला, त्यावेळी डेलकर यांची आठवण झाली. येथील दहशत आम्ही नक्की मोडून काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात काहीच काम बाकी नाही, त्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्री पाच दिवसापासून येथे बसले आहेत. पश्चिम बंगालमध्ये जसे संपूर्ण मंत्रिमंडळ आणि देश उतरला होता, त्याच पद्धतीने येथेही होणार आहे. येथे अजून मुख्यमंत्री आणि मंत्री येथील त्याचे स्वागत आहे, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला. मात्र, आमच्या उमेदवारासमोर त्यांच्या मंत्र्यांचे काही चालणार नाही. विकासावर बोलायचे सोडून इतर गोष्टींवर बोलणे हा त्यांचा धंदाच आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

Sanjay Raut, Amit Shah
उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांचेही फडणवीसांवर जोरदार प्रहार!

शिवसेना या देशाचे भविष्य आहे. मोहन डेलकर यांचे पुत्र शिवसेनेत चांगले काम करतील. मोहन डेलकर यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करत आहे. दादरा नगर हवेलीचे विकासाचे मुद्दे डेलकर उपस्थित करत होते. त्याच पद्धतीने कलाबेन काम करतील. येथील प्रशासनाची मुजोरी आम्ही मोडून काढू, महाराष्ट्र बाजूला आहे आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री तेथे आहे त्यामुळे काळजी करण्याचे काम नाही, असेही राऊत म्हणाले. शिवसेना पहिल्यादाच महाराष्ट्राबाहेर लोकसभेची निवडणूक लढत आहे. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रीय राजकारणाचे नेतृत्व करेल. त्याची सुरुवात दादरा नगर हवेलीतून होईल. दादरा नगर हवेलीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील कलाबेन यांचा विजय सर्वात मोठा असले, असेही राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com