जाधव, गायकवाड अन् रायमुलकरांचे टेन्शन वाढले; खासदार, आमदार गेले तरी ठाकरेंनी सभा गाजवली

Uddhav Thackeray News : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथी उद्धव ठाकरे यांनी शेतकरी मेळावा घेतला
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

बुलडाणा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकरी मेळावा घेतला. या शेतकरी मेळाव्याला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर चौफेर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे यांची विदर्भात पहिलीच सभा झाली.

ठाकरेंनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात बुलडाणा जिल्यातून केली. बुलडाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रताबराव जाधव (Pratabrao Jadhav), मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर (Sanjay Raimulkar) आणि बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि सिंदखेडराजा मंतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर हे (बाळासाहेबांची शिवसेना) म्हणजे शिंदे गटात गेले आहेत.

Uddhav Thackeray News
Eknath Shinde : शिंदे गटात नाराजी; चार मंत्री अन् सहा आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा दौरा टाळला?

तसेच जिल्ह्यातील काही खासदार आणि आमदारांच्या जवळचे पदाधिकारी त्यांच्या सोबत गेले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत आहेत. त्यामुळे खासदार, आमदार शिंदे गटात आणि कार्यकर्ते ठाकरे गटात अशी काहीशी परिस्थिती जिल्ह्यात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि आमदारांना घेरण्यासाठी जून्या शिवसैनिकांना पुन्हा पुढे आण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

बुलडाणा जिल्हा तसा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. खासदार जाधव हे तीसऱ्यादा लोकसभेवर निवडणून गेले आहेत. त्यांच्या आधी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनीही जिल्ह्याचे तीन वेळा नेतृत्व केले आहे. त्यामुळे बुलडाणा नियमीत शिवसेनेच्या पाठिशी उभा राहिला आहे. त्यामुळेच शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरेंसाठी हा जिल्हा महत्त्वाचा आहे. आपली ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंचे खासदार गवळींना टोले अन् बच्चू कडूंच्या जखमेवर मीठ...

त्यामुळे त्यांनी आज शेतकरी मेळावा घेतला. मात्र, आमदार खासदार नसतानाही, ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली. जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्यामुळे खासदार जाधव, आमदार संजय रायमुलकर आणि संजय गायकडवा यांच्यापुढील अडचणी नक्कीच वाढल्या आहेत. ठाकरेंच्या सभेला मिळालेला प्रतिसाद खूप काही सांगून गेला, असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com