Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : शिवरायांच्या वाघनखांनी काढला,राजकारण्यांचा वैचारिक कोथळा..!

Shivaji Maharaj Iconic Tiger Claws News Update : छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या साह्यानं अफजल्याचा कोथळा बाहेर काढल्याच्या घटनेला 365 वर्षे झाली आणि आज आपली राजकारणी मंडळी त्याच वाघनखांच्या साह्यानं एकमेकांचा वैचारिक कोथळा बाहेर काढत सुटली आहेत.
Shivaji Maharaj Wagh Nakh
Shivaji Maharaj Wagh NakhSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Shivaji Maharaj News : हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला वध केला होता. वाघनखांच्या साह्यानं त्याचा कोथळा बाहेर काढला होता. या घटनेला 365 वर्षे लोटली, मात्र इतकी वर्षे उलटूनही आतापर्यंतचे राज्यकर्ते हीच ती वाघनखं, असं छातीठोकपणे सांगून त्या वाघनखांचं दर्शन तमाम शिवप्रेमींना घडवू शकले नाहीत, हे त्यांचं अपयश आणि आपलं दुर्दैव म्हणावे लागेल.

आजही आपण शिवरायांनी वापरलेली अस्सल वाघनखं कोणती आणि ती कुणाकडं आहेत या प्रश्नांची ठाम उत्तरं मिळवू शकलेलो नाही. राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि इतिहास संशोधकांमधील एकमताचा अभाव यामुळं अस्सल वाघनखं कोणती यावरून सध्या खल सुरू झालाय.

लंडनमधील 'ती' वाघनखं शिवरायांची नाहीत?

लंडनस्थित म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आलेली 'ती' वाघनखं खरी, असं सत्ताधारी आणि काही इतिहास संशोधक म्हणत आहेत तर 'ती' वाघनखं खरी नव्हेत, असं विरोधक आणि काही इतिहास संशोधक म्हणत आहेत. आता खरं काय नि खोटं काय याचं उत्तर मिळवण्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यात भरीस भर म्हणून की काय लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं आमच्याकडं असलेली वाघनखं छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहेत, असा कोणताही पुरावा आमच्याकडं उपलब्ध नाही, असं स्पष्टीकरण देत राज्य सरकारला (State Government) तोंडावर पाडलंय.

छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध करतेवेळी हीच वाघनखं वापरली किंवा कसे याबाबत संभ्रम आहे, असंही या म्युझियमचे संचालक डॉ. ट्रिस्टरॅम हंट यांनी म्हटलंय. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्युझियमशी केलेल्या पत्रव्यवहाराला देण्यात आलेल्या उत्तरादाखल पत्रात म्युझियमकडून ही बाब नमूद करण्यात आली आहे.

Shivaji Maharaj Wagh Nakh
Ramdas Athwale News : आठवलेंना टाळत चंद्रकांतदादा आंबेडकरांच्या कार्यक्रमाला; रिपाई कार्यकर्त्यांचा संताप

'ती' वाघनखं आजही साताऱ्यातच!

छत्रपती शिवरायांची वाघनखं सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँट डफला भेट दिली, असं सांगितलं जातं मात्र प्रतापसिंह महाराजांसारखा अत्यंत शिवप्रेमी माणूस ही वाघनखं देईलच कसा? मूळात ती वाघनखं बाहेर जातीलच कशी, असा प्रश्न इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. सावंत यांच्या म्हणण्यानुसार, आजही ती वाघनखं साताऱ्यातील छत्रपती घराण्याकडं असून त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं, असं आवाहन देखील त्यांनी केलंय.

1971 मध्ये 'ती' वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये

सावंत यांनी म्युझियमशी पत्रव्यवहार करताना ज्या अ‍ॅड्रियन ग्रँट डफ यांच्याबाबत आणि त्यांना भेट देण्यात आलेल्या वाघनखांबाबत संग्रहालयाकडे विचारणा केली होती त्यांचाही उल्लेख म्युझियमकडून त्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात केलाय.

त्या पत्रात म्हटल्यानुसार, अ‍ॅड्रियन ग्रँट डफ यांचा मृत्यू 1914 मध्ये झाला. ते जेम्स ग्रँट डफ यांचे नातू होत आणि ज्या अ‍ॅड्रियन ग्रँट डफ यांनी म्युझियमला वाघनखं भेट दिली त्यांचा मृत्यू 2019 मध्ये झाला. आमच्याकडील उल्लेखाप्रमाणं 28 ऑक्टोबर 1971 या दिवशी ही वाघनखं म्युझियममध्ये आली, होती, असंही या पत्रात म्हटलंय.

Shivaji Maharaj Wagh Nakh
Sanjay Raut On BJP : आणीबाणी अन् मोदी-शाह; बाळासाहेबांचा संदर्भ देत संजय राऊतांनी भाजपला पुन्हा गाठलं

राज्य सरकारचा दावा की कांगावा?

छत्रपती शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखान वधावेळी वापरलेली वाघनखं लंडनस्थित व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असून ती वाघनखं आम्ही घेऊन येणार, असा दावा राज्य सरकारतर्फे केला जात आहे. मात्र ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत, असं ते म्युझियम स्वतः सांगतं आहे. शिवाय ही वाघनखं भारतात घेऊन गेल्यानंतर तुम्ही ती जिथं प्रदर्शित कराल तिथं 'ही'वाघनखं शिवरायांची नाहीत आणि त्याच्या सत्यतेविषयी खात्रीपूर्वक सांगता येत नाही, अशा पद्धतीचं पत्रंही प्रदर्शित करा, असंही म्युझियमच्या संचालकांनी लंडनला करारासाठी गेलेले सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं.

असं असूनही संबंधित मंत्री आणि अधिकारी धादांत खोटं बोलून जी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, ती त्यांचीच आहे असं सांगत सुटलेत आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत, असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. त्यामुळं राज्य सरकार दावा करतंय की कांगावा करतंय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Shivaji Maharaj Wagh Nakh
Dhairyasheel Mohite Patil : 'त्यांचा' जनतेनेच करेक्ट कार्यक्रम केला; मोहिते पाटलांनी दिले शेखर गोरेंना क्रेडीट...

लंडनच्या म्युझियममधील 'ती' वाघनखं खरी!

ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी मात्र इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा आरोप खोडून काढत लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वाघनखंच शिवरायांची खरी वाघनखं असल्याचा दावा केलाय. 'कुठल्याही म्युझियमला जेव्हा एखादी वस्तू दिली जाते तेव्हा तिची रीतसर नोंद केली जाते. अ‍ॅड्रियन ग्रँट डफ यांच्या वंशजांनी भेट दिलेली हीच ती छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखं, अशी तिथं नोंद आहे. त्यामुळं हीच ती वाघनखं, असं समजायला हरकत नाही,' असं पांडुरंग बलकवडे यांनी म्हटलंय.

एकूणच काय तर खरी वाघनखं कोणती, ती कुठं आहेत या प्रश्नांची उत्तरं देखील त्या वाघनखांप्रमाणंच अजूनही मिळू शकलेली नाहीत. देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष सरलं तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आपण आपल्या जनतेला दाखवू शकलो नाही याची आजच्या राज्यकर्त्यांना ना लज्जा ना तमा!

निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या भावनांना हात घालायचा आणि मतं मिळवायची हाच काय तो या राज्यकर्त्यांचा एककलमी कार्यक्रम! मग कधी भवानी तलवार आणण्यावरून एकमेकांवर शाब्दिक वार करायचे किंवा कधी वाघनखं आणण्यावरून एकमेकांचा वैचारिक कोथळा बाहेर काढायचा हाच काय तो धंदा!

असो, तुम्ही भवानी तलवार आणा किंवा नका आणू, तुम्ही वाघनखं आणा किंवा नका आणू, जनतेच्या हृदयसिंहासनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचार-विचारांचं अढळ स्थान कालही होतं, आजही आहे आणि युगानुयुगे राहील...

Shivaji Maharaj Wagh Nakh
Sandeshkhali Case Update : ममता सरकारला सर्वोच न्यायालयाचा मोठा झटका; संदेशखाली प्रकरणी 'CBI' तपास सुरूच राहणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com