Dhairyasheel Mohite Patil : 'त्यांचा' जनतेनेच करेक्ट कार्यक्रम केला; मोहिते पाटलांनी दिले शेखर गोरेंना क्रेडीट...

Political News : माण, खटाव मतदारसंघात शेखर गोरेंनी माझ्यासाठी एकट्याने स्वतंत्र यंत्रणा राबवत अनेक सभा घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे, असा विश्वास माढाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

विशाल गुंजवटे

Maan News : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी माण, फलटण, माळशिरस हे मतदारसंघ टार्गेट केले. याठिकाणी साम, दाम सर्व ताकद वापरून मोठे मताधिक्य घ्यायचा त्यांचा प्लॅन होता. पण, यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनतेनेच ठरवलं होत. तो त्यांनी करून दाखवला. माण, खटाव मतदारसंघात शेखर गोरेंनी माझ्यासाठी एकट्याने स्वतंत्र यंत्रणा राबवत अनेक सभा घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे, असा विश्वास माढाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.

कुळकजाई (ता. माण) येथील आर्यन फॉर्म हाऊसवर मतदारांच्या आभार मेळाव्यात खासदार मोहिते पाटील बोलत होते. मोहिते-पाटील म्हणाले, आता आपले लक्ष्य विधानसभा असून शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या तिघांच्या विचारांचा आमदार आपल्याला द्यायचा आहे. यासाठी महाविकास आघाडीतील सर्वांना एकत्र येत मोळी बांधणे गरजेचे आहे. उमेदवार कोण असेल हे आताच बोलण योग्य नाही, पण तुम्ही निश्चित राहा.

आमदार महाविकास आघाडीचाच (MVA) असेल. मला आपण मतदान करून दिल्लीत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी माण, खटावच्या जनतेच आभार मानतो. शेखरभाऊंनी मोठा राजकीय संघर्ष केला असून यापुढे त्यांना आम्ही योग्य दिशेने नेणार आहे. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या हक्काचा खासदार आहे. कधीही भेटा, फोन करा. कामे सांगा मी रात्रंदिवस तुमच्या सेवेसाठी तत्पर असणार असेही मोहिते पाटलांनी स्पष्ट केले.

शेखर गोरे म्हणाले, माण खटाव मतदारसंघात निवडणूकीदरम्यान मी १३ सभा घेतल्या. यात मला कार्यकर्ते म्हणत होते भाऊ आपल्या सभांना कोणीच मोठा नेता नाही. उमेदवार भैय्या नाहीत. मी त्यांना एकच सांगत होतो, भैय्या म्हणजे मीच उमेदवार आहे असे समजून कामाला लागा. एका बाजूने आपण तर दुसऱ्या बाजूने प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयदादा जगताप, रणजितसिंह देशमुख आदींनी आपल्या परीने प्रचार यंत्रणा राबवली होती.

Dhairyasheel Mohite Patil
Vidhan Parishad Election: ठाकरे गट, भाजप अलर्ट, फोडाफोड टाळण्यासाठी उचललं मोठं पाऊल; आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम ?

आपण लावलेली यंत्रणा नेत्यांना माहित होती. त्यामुळे मला ती सांगण्याची गरज वाटत नाही. आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा उमेदवार कोणीही असू द्यात, आघाडीच्या सर्व नेतेमंडळी, कार्यकर्त्यांनी एकत्र राहून आपला आमदार निवडून आणायचा आहे. यासाठी सर्वानी कामाला लागा, असे आवाहनही शेखर गोरे यांनी केले.

Dhairyasheel Mohite Patil
Maratha Reservation News : जरांगे पाटील मराठवाडा दौऱ्यावर; हाके, वाघमारेंनी गाठली थेट अंतरवाली सराटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com