Shivsena Analysis: सब बर्दाश्त किया जाएगा, लेकीन 'खोके'बाजी नही; मुंबई ठाकरेंचीच ?

Shivsena Uddhav Thackeray Vs Ekanth Shinde News : पहिल्या काही फेऱ्यांत ठाकरेंच्या शिलेदारांची आघाडी दिसून आली. तेव्हाच फोडाफोडी करणाऱ्यांना घाम फुटला. या फेऱ्यांमधील आकड्यांनी मुंबई ठाकरेंची छाप राहून शकते, हेच दिसून आले आहे.
Uddhav thackeray
Uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 Results : ठाकरें 'सीएम' झाले; जुना मित्र भाजपला लांब ठेवून अन तेवढीच जुनी 'दुश्मनी' असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेसच्या साथीने. पण, सत्तेच्या खुर्चीची हाव असलेल्या भाजपने ठाकरेंना दातात धरले आणि जेमतेम दोन-सव्वादोन वर्षांत त्यांचे 'सीएम' पद काढले. म्हणजे, थेट ठाकरेंच्या कळपातील शिंदे फोडले, त्यांच्यासोबत 50 आमदार खेचले आणि ठाकरेंना सत्तेतून बाहेर ढकलले. ठाकरेंची 'सीएम'पदाची खुर्ची तर गेलीच. त्यापलीकडे जाऊन ठाकरेंना दिल्लीत मान ठेवला नाही, त्यासाठी त्यांचे डझनापेक्षा अधिक खासदार फोडले.

मुंबई महापालिकेतील शंभर-सव्वाशे माजी नगरसेवक, 5-50 माजी आमदारही शिंदेही आपल्याकडे ओढले. अर्थात, ठाकरेंचे राज्य संपवल्यानंतर त्यांना मुंबई महापालिकेच्या सत्तेतून हाकलण्याचा शिंदे-फडणवीसांचा इरादा राहिला. एवढे करूही न भागलेल्या शिंदे-फडणवांसीनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thakeray) साथीला घेतले. यानिमित्ताने ठाकरेंची मुंबईतील सद्दी संपविण्याचा 'मेगाप्लॅन' आखला गेला.

लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंना छोबीपछाड देण्याचा शिंदे-फडणवीस-राज यांचा पवित्रा राहिला. मात्र, लोकसभा निवडणुकीत फडणवीस, शिंदेपेक्षा तगडे उमेदवार देऊन ठाकरेंनी आपण ठाकरे असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर ठाकरेंच्या चालीपुढे शिंदे-फडणवीसांची दमछाक झाली. त्यातून 'ईडी'च्या दारात गेलेल्या यामिनी जाधव, रवींद्र वायकर (Ravindra Wyakar), कोर्टातील 'बादशाह' उज्वल निकम यांच्यासारख्यांना तिकिट द्यावे लागले.

पहिल्या लढतीत, तिकिट वाटपातच ठाकरे भारी ठरल्याने शिंदे-फडणवीसांची डोकेदुखी वाढली. एक्झिट पोलनेही ठाकरे कुठे कमी पडणार नसल्याचे सूचित केले. त्यानंतर मुंबईतील 6 पैकी 5 जागांवर ठाकरेंनी ताकद दिलेल्या उमेदवारांची विजयी घोडदौड पाहायला मिळाली. अर्थात, पहिल्या काही फेऱ्यांत ठाकरेंच्या शिलेदारांची आघाडी दिसून आली. तेव्हाच फोडाफोडी करणाऱ्यांना घाम फुटला. या फेऱ्यांमधील आकड्यांनी मुंबई ठाकरेंची छाप राहून शकते, हेच दिसून आले आहे.

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर सुरुवातीपासून चुरस होती. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आघाडी घेत सहापैकी चार जागा पदरात पाडून घेतल्या होत्या. तर काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या होत्या.

जागावाटप झाल्यानंतर लगेचच ठाकरे गटाने उमेदवार घोषित करून प्रचारात आघाडी घेतली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला फायदा झाला. दुसरीकडे शिंदे गटाला महायुतीच्या जागावाटपात शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावे लागले. त्यामुळे त्यांच्या वाट्याला मुंबईतील तीन जागा आल्या. दुसरीकडे शिंदे गटाकडे तगडे उमेदवार नसल्याने दोन आमदारांना निवडणूक रिंगणात उतरवले होते.

ठाकरे गटाने दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून अनिल देसाईंना (Anil Desai) निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant), उत्तर-पूर्व ईशान्य मुंबईमधून संजयदिना पाटील, उत्तर-पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तिकर यांना रिंगणात उतरवले होते. शिंदे गटाने दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून विद्यमान खासदार राहुल शेवाळे, दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव, उत्तर-पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते.

दुसरीकडे ठाकरेंची मशाल धगधगत असतानाच,लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांभी उभे केलेल्या 10 पैकी 6 जण खासदार होणार असल्याचे एक्झिट पोलने दाखवून दिल्यापासून या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे. दुसरीकडे प्रत्यक्षात मतमोजणी सुरू झाल्यापासून पहिल्या दोन-अडीच तासांतील कलही पवारसाहेबांच्या बाजुने दिसत आहेत. अर्थात, अजितदादांच्या पक्षाने लढवलेल्या चारपैकी एका जागेवरही या गटाचा आघाडी दिसत नाही.

साहजिकच या अजितदादांसह या पक्षातील बडे नेते, आणि नऊ मंत्रीही बचकळ्यात पडले आहेत. या निकालाचे आकडे पुढे येत असतानाच अजितदादा आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात मुंबईत देवगिरी बंगल्यात बैठक सुरू आहे. निकालादरम्यानच ही बैठक होत असल्याने तिला प्रचंड महत्त्व आले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार, त्यानंतर ते मीडियापुढे येणार का, याकडे लक्ष राहणार आहे. भाजपच्या बावनकुळे यांनी दुपारीच सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com