शिवसेना-भाजपने एकत्र यावे का?... राज्यातील जनता म्हणते...

शिवसेनेला महाविकास आघाडीतील आपला खुंटा बळकट करण्याची संधी म्हणून याकडे पाहता येईल.
shivsena-BJP
shivsena-BJPSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना (shiv sena) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) भविष्यात एकत्र येतील, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात होत असते. मात्र, राज्यातील ५५ टक्के जनतेला शिवसेना आणि भाजपची युती होऊ नये, असे वाटते. एकत्र आले पाहिजे, असे मात्र आजही २८.५ टक्के लोकांना वाटते आहे. हे #कलमहाराष्ट्राचा #sakalsaamsurvey या तून पुढे आले आहे. (Should Shiv Sena-BJP come together? ... People in the state say ...)

राज्यातील महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) राज्यात सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. त्यात जनतेच्या मनातील गोष्ट स्पष्टपणे दिसून येत आहे.

shivsena-BJP
काँग्रेस २०२४ मध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का..? सत्यजित तांबे म्हणाले...

शिवसेना आणि भाजपची युती व्हावी, या प्रश्नावर राज्यातील ५५ टक्के जनतेने नकरार्थी उत्तर दिले आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील इतर दोन घटक पक्ष आणि सेना-भाजपमधील गटही सहभाही असू शकतो, त्यामुळे हे प्रमाण बहुसंख्य आहे. पण या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे अजूनही राज्यातील २८.५ टक्के मतदारांना वाटते. ही भाजपसाठीची सरकारमध्ये दरी पाडण्याची संधी आणि शिवसेनेला महाविकास आघाडीतील आपला खुंटा बळकट करण्याची संधी म्हणून याकडे पाहता येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाकाळात घेतलेल्या निर्णयांबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांच्या एकूण कामाबद्दल तब्बल ६८.३ टक्के जनतेने सकारात्मकता दाखवली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची खुर्ची बळकट करणारा हा कल आहे. कारण, त्यांच्या कामाबद्दल निराशा असणाऱ्यांचा कौल फक्त १३.८ टक्के लोकांचा आहे.

shivsena-BJP
जनतेचा कल पाहून आनंद; पण विरोधकांना कमी लेखून चालणार नाही : गोऱ्हे

एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर सर्वाधिक २१. ८ टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अपेक्षेपेक्षा कमी काम होत असल्याचे १७.७ टक्के मतदान सांगते आहे. जुलैमधील विधीमंडळ अधिवेशनात भाजपच्या आमदारांना निलंबित केले गेले होते. ते अधिवेशन भाजपने विधीमंडळाबाहेर घालवले, त्यानंतर भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांनाही सूर गवसलेला नाही. हे या सर्व्हेक्षणाचा कौल अधोरेखीत करतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com