जनतेचा कल पाहून आनंद; पण विरोधकांना कमी लेखून चालणार नाही : गोऱ्हे

महाविकास आघाडीला नीलम गोऱ्हेंचा सूचक इशारा
mood Maharashtra
mood MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर कसा करायचा, हे दाखवून दिले आहे. त्यांनी अनेकांना वेसन घालण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे काय झाले, हे दिसून आले आहे. साम दाम दंड भेद करून त्यांनी सत्तेसाठी प्रयत्न केले. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आमचे काम मजबूत आहे. पण, विरोधकांना कमी लेखून चालणार नाही, असा सूचक इशारा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. (Neelam Gorhe's warning to Mahavikas Aghadi)

महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्षे झाली आहेत. आज जर निवडणुका झाल्यास परिस्थिती काय असेल? याचा कल सकाळ-सामने केलेल्या 'मूड महाराष्ट्राचा' सर्वेक्षणातून जाणून घेतला आहे. राज्यात आज निवडणूक झाल्यास पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील. भाजपला सर्वाधिक 104 जागा मिळतील, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आला आहे. त्याबद्दल गोऱ्हे बोलत होत्या.

mood Maharashtra
मूड महाराष्ट्राचा : जाणून घ्या महाराष्ट्राची राजकीय हवा

आमदार गोऱ्हे म्हणाल्या की, सन 2013 पासून अनेक सर्व्हे झाले आहेत. जेव्हा 2014 स्थलांतराचा ‘सकाळ’चा कौल झाला, तेव्हा त्यातून अनेक गोष्टी घडल्या होत्या. सध्याचा राज्याचा कल पाहता आनंद जरुर आहे. दोन वर्षे पूर्ण होताना ठाकरे सरकारला आणखी मोठी झेप घेण्याची गरज वाटते. कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही चांगले काम केल्याचे दिसून येत आहे. पण, आम्ही विरोधकांना अंडरइस्टेमेट करता येणार नाही, हेही तितकेच महत्वाचे आहे.

mood Maharashtra
आज निवडणूक झाली तर महाविकास आघाडी उडविणार भाजपचा धुव्वा!

दरम्यान, पक्ष म्हणून सारे स्वतंत्र लढल्यास भाजपला सर्वाधिक म्हणजे २७.९ टक्के जनाधार राहील; त्याखालोखाल शिवसेनेला २४ टक्के जनाधार राहील. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शेवटी काँग्रेस असा कौल आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २५.७५, शिवसेनेला १६.४१, राष्ट्रवादीला १६.७१ आणि काँग्रेसला १५.८७ टक्के मतदान झाले होते. जवळपास तोच क्रम आताही कायम आहे. आज निवडणूक झाल्यास शिवसेना 77, राष्ट्रवादी 59, काँग्रेस 40 आणि भाजप 104 जागा अशी स्थिती राहील, असा निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आले आहे.

भाजप सगळ्यात मोठा पक्ष

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली आहे. राज्याच्या इतिहासातील ही एक आगळी घडामोड होती. दोन वर्षे सरकार टिकेल का, अशी शंका व्यक्त केली जात होती. तीन पक्षांचे सरकार शंका लोकांना मान्य होईल का, अशीही शक्यता व्यक्त होत होती. आता सरकारला दोन वर्षे झाली याबद्दल जनतेला काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील सर्व घटकांचा कल जाणून घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com