BJP Politics: नाशिकमधील भाजपचे आमदार बेदखल! कोणीही येतं अन् डावलून जातं

BJP Politics: सिंहस्थ कुंभमेळ्यात बाहेरचे भाव खातात, नाशिकचे आमदार मात्र फक्त नावालाच
Hir, Farande, Dhikale
Hir, Farande, Dhikale
Published on
Updated on

Nashik BJP News: सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक उत्सव मानला जातो. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तो पक्षाला मायलेज देणारा उत्सव आहे. त्यादृष्टीने महायुती सरकार या उत्सवाकडे पाहते आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या. या बैठकांसाठी नाशिकच्या चार मंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींकडे कानाडोळा करण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी एक हाती सर्व नियोजन आपल्या हाती ठेवले आहे.

Hir, Farande, Dhikale
Air India: विमान प्रवासात प्रवाशानं दिला आमदाराला चोप! 'केबिन क्रू'नं मध्यस्थी केली अन्यथा...; नेमकं काय घडलं?

आतापर्यंत झालेल्या बैठका आणि विविध विभागांकडून विकासकामांचा आराखडा याची सातत्याने चर्चा होत आहे. याबाबत दोन बैठका स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्या. त्यामुळं सिंहस्थ कुंभमेळ्याकडे शासन गांभीर्याने पाहते हे स्पष्ट झाले आहे. हे सर्व नियोजन सुरू असताना जिथे कुंभमेळा होत आहे. त्या नाशिक शहरातील भाजपच्या आमदारांना मात्र कोणीच विचारेना अशी स्थिती आहे. कुंभमेळ्याबाबत आजवर सध्याच्या आमदार देवयानी फरांदे सीमाताई हिरे आणि राहुल ढिकले यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

Hir, Farande, Dhikale
Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंच्या जावयाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, फॉरेन्सिक रिपोर्टमुळे मिळणार 'त्या' आरोपातून क्लिनचिट?

भाजपच्या आमदार फरांदे आणि हिरे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. सिंहस्थ कुंभमेळा प्रत्यक्षता आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघात होतो. आमदार ढिकले हे देखील दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. भाजपकडे शहरात आमदारांची अनुभवी टीम असताना त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका तर मंत्री आणि राज्य शासनाने घेतली नाही ना? असा प्रश्न पडतो. या आमदारांचे महत्त्व कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक राजकीय डावपेच सुरू आहेत, त्याची प्रचिती यापूर्वी अनेकदा आली आहे.

Hir, Farande, Dhikale
Uddhav Thackeray question to BJP: कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत का? उद्धव ठाकरेंचा सवाल

जिल्ह्यात सर्वच्या सर्व आमदार महायुतीच्या घटक पक्षांचे आहे. यामध्ये पाच आमदार भाजपचे आहेत. तीन तीन आमदार कुंभमेळा होत असलेल्या नाशिक शहरात आहेत. मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिपदाचा शब्द निवडणूक प्रचारात दिला होता. यंदा कुंभमेळा होत असल्याने नाशिकच्या भाजपच्या किमान एका आमदाराला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. त्याऐवजी नाशिकचा कुंभमेळा जिल्हा बाहेरच्या मंत्र्यांकडून हाताळला जात आहे. राज्य शासनातील वरिष्ठ नेते देखील जिल्हा बाहेरच्या नेत्याला नाशिकचे नेतृत्व देत असल्याने नागरिकांमध्ये तो चर्चेचा विषय आहे.

Hir, Farande, Dhikale
Ratnagiri Politics : चार पंचायत समित्यांवर महिलाराज! रत्नागिरीत नेत्यांची डोकेदुखी वाढली! उदय सामंत यांनाही करावी लागणार तारेवरची कसरत

सध्या जिल्ह्यात छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहे. याशिवाय नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तर दादा भुसे हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री आहेत. त्या तुलनेत भाजपकडे अधिक कार्यक्षम आणि अनुभवी आमदार असताना जाणीवपूर्वक त्यांचे महत्व कमी करण्यासाठी कोण सूत्रे हलवत आहेत? हा चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com