Air India: विमान प्रवासात प्रवाशानं दिला आमदाराला चोप! 'केबिन क्रू'नं मध्यस्थी केली अन्यथा...; नेमकं काय घडलं?

Air India: एका आमदाराला विमानातच प्रवाशानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. दोघांमध्ये झालेल्या या हाणामारीत विमानातील केबिन क्रूनं मध्यस्थी केली आणि त्यांच्यातीव वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
Aircraft Maintenance
Air Indiasarkarnama
Published on
Updated on

Air India: एअर इंडियाच्या विमानात एका आमदाराला प्रवाशानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. दोघांमध्ये झालेल्या या हाणामारीत विमानातील केबिन क्रूनं मध्यस्थी केली आणि त्यांच्यातीव वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता असं इतर प्रवाशांकडून सांगितलं जात आहे. दिल्ली-लखनऊ फ्लाईटमध्ये हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे.

Aircraft Maintenance
सरसंघचालक Mohan Bhagwat यांना मिळाला प्राणप्रतिष्ठापनेचा मान | RSS | Ganesh Festival Pune

नेमका प्रकार काय?

दिल्ली-लखनऊ विमानात अमेठीच्या एका आमदारामध्ये आणि एका प्रवाशात जोरदार शाब्दिक वाद आणि त्यानंतर हाणामारी झाली. या विमानाशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी एअर इंडियाच्या AI-837 या विमानात हा प्रकार घडला. अमेठीच्या गौरीगंज मतदारसंघाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी एक प्रवासी समद अली हे फोनवर बोलत असताना आक्षेपार्ह शब्द वापरत असताना त्यावर आक्षेप घेतला. इतर प्रवाशांनी देखील समद अली या प्रवाशाच्या भाषेवर आक्षेप घेतल्यानंतर तो विमानातच जोरजोरात ओरडायला लागला. यानंतर मला या प्रकरणाची दखल घेणं भाग पडलं, असं आमदार राकेश प्रताप सिंह यांनी सांगितलं.

Aircraft Maintenance
Chandrashekhar Bawankule : प्रत्येक गावात होणार 100% पीक पाहणी; बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

लखनऊला पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, तो प्रवाशी सातत्यानं शिवीगाळ करत होता. हे कुठल्याही सभ्य समाजासाठी स्वकारार्ह नाही. जेव्हा मी त्याला ठामपणे थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यानं माझ्यासोबत गैरव्यवहार केला. तो मारहाण करण्यावर आला. पण विमान हवेत असताना विमानात हा गोंधळ सुरु झाल्यानं शेवटी केबिन क्रूला त्या दोघांचं भांडण सोडवण्यासाठी पुढे यावं लागलं. यानंतर आमदार राकेश प्रताप सिंह यांनी संबंधित प्रवाशाविरोधात सरोजनी नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर एफआयआर दाखल करण्यात आली.

Aircraft Maintenance
Nilesh Ghaywal passport case : निलेश घायवळ पळला स्वित्झर्लंडला, पुणे पोलिस तपासाला नगरला; फिल्मसारखचं झालं, पुलिस हमेशा देर से क्यों पहुंचती है, सर!

पोलिसांनी याप्रकरणावर भाष्य करताना म्हटलं की, याप्रकरणाची चौकशी आम्ही सुरु केली आहे. संविधान आपल्याला स्वातंत्र्य देतं, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण याचा दुरुपयोग करावा. इतरांच्या आत्मसन्मानाला ठेच लागलं असं त्याला वागता येणार नाही, असं आमदार राकेश सिंह यांनी म्हटलं आहे. फतेहपूर जिल्ह्याच्या राजजीपूर गावातील या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली आहे.

Aircraft Maintenance
Anil Joshi News : राहुल गांधींची रणनीती, भाजपचे माजी मंत्री अनिल जोशी काँग्रेसच्या वाटेवर; कृषी कायद्यांना केला होता कडाडून विरोध...

तीन वेळा आमदार

दरम्यान, राकेश प्रताप सिंह हे तीन टर्म आमदार राहिले आहेत. २०१२ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली. दरम्यान, विमानात उपद्रव माजवणाऱ्या प्रवाशावर नो फ्लाईट लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं. सरकारच्या माहितीनुसार, या वर्षी ३० जुलैपर्यंत काम करताना ४८ पॅनेंजर्सना या यादीत टाकण्यात आलं आहे. त्यानुसार, समद अली नामक या गोंधळ घालणाऱ्या प्रवाशावरही कारवाई होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com