लोकप्रिय गायकाच्या काँग्रेस प्रवेशाने आमदारासह पाच नेत्यांचा पत्ता कट?

लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला हा काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे.
Rahul Gandhi, Sidhu Moose Wala and Navjot Singh Sidhu
Rahul Gandhi, Sidhu Moose Wala and Navjot Singh Sidhu Sarkarnama

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला (Sidhu Moose Wala) हा काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे. यामुळे काँग्रेसला (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यासोबत आणखी एक सिद्धू मिळाला आहे. गायक सिद्धू याला मानसा मतदारसंघातून तिकिट मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रवेशामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे तेथून तिकिटासाठी मोर्चेबांधणी केलेल्या आमदारासह पाच नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

सिद्धू मूसे वाला याने नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिद्धू हा मानसातील मूसा गावातील आहे. त्याची आई गावची सरपंच आहे. तो मानसा मतदारसंघातील असल्याने तो तेथूनच निवडणूक लढू शकतो. यामुळे तेथून तिकिटासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पुढील वर्षांच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे.

Rahul Gandhi, Sidhu Moose Wala and Navjot Singh Sidhu
वादग्रस्त गायकाची काँग्रेसमध्ये एंट्री अन् प्रदेशाध्यक्षांची सारवासारव

मानसा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार नजरसिंग मनशाहिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते आता मानसामधून विधानसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत. याचबरोबर माजी आमदार मंगतराय बन्सल यांच्या पत्नी मनोज बाला या इच्छुक आहेत. बाला यांचा 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तसेच, मनजितसिंग झालबुटी आणि गुरप्रितसिंग विकी यांनीही तिकिटावर दावा सांगितला आहे. माजी मंत्री शेरसिंग गागोवाल यांची सून गुरप्रितकौर गागोवाल यांनी तिकिटासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यांनी नुकतेच मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केले. गुरप्रितकौर यांचा 2012 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आता सिद्धू याच्या पक्षप्रवेशाने हे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. आता सर्व नेत्यांनी अपक्ष म्हणून लढण्याची तयारीही ठेवली आहे.

Rahul Gandhi, Sidhu Moose Wala and Navjot Singh Sidhu
मोदी सरकारची कोंडी होताच अमित शहांनी फोन फिरवला अन् फिरली चक्रे

गायक सिद्धू हा 28 वर्षांचा असून, त्याच्यावर अनके गुन्हे दाखल आहेत. गाण्यातून बंदुकीचा वापर आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्याबद्दल त्याच्यावर हे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गँगस्टर रॅपचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याच्या गाण्यातून अनेक वेळा जातीपातीतील भेदभावाचे समर्थन केले जाते. त्याचे खरे नाव सिद्धूसिंग असे आहे. अभियांत्रिकी करीत असताना त्याने कॉलेजमध्ये गाणे सुरू केले. त्याने एका गाण्यात एके-47 रायफलचा वापर केला होता. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात हे गाणे व्हायरल झाले होते. याचबरोबर सिद्धूवर गुन्हाही दाखल झाला होता. तो अनेकवेळा त्याच्या गाण्यात जातीच्या अभिमानाबद्दल बोलताना दिसतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com