वादग्रस्त गायकाची काँग्रेसमध्ये एंट्री अन् प्रदेशाध्यक्षांची सारवासारव

लोकप्रिय पण वादग्रस्त असलेला पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला हा काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे.
Congress
Congress Sarkaranama

नवी दिल्ली : पंजाबचे (Punjab) तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांची काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यामुळे विकेट पडली होती. नंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी हाती घेतली असली तरी पक्षाचे नेतृत्व सिद्धू करीत आहेत. आता या सिद्धूंसोबत आणखी एक सिद्धू काँग्रेसला मिळाला आहे. लोकप्रिय पण वादग्रस्त असलेला पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला (Sidhu Moose Wala) हा काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे.

सिद्धू मूसे वाला हा लोकप्रिय असण्यासोबत वादग्रस्तही आहे. त्याने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चन्नी यांनी त्याचे स्वागत केले. गायक सिद्धू हा 28 वर्षांचा असून, त्याच्यावर अनके गुन्हे दाखल आहेत. गाण्यातून बंदुकीचा वापर आणि हिंसाचाराला खतपाणी घातल्याबद्दल त्याच्यावर हे गुन्हे दाखल आहेत. त्याचे मूळगाव मनसामध्ये असून, त्याच मतदारसंघातून तो निवडणूक लढू शकतो, अशी शक्यता आहे. त्याच्या गँगस्टर रॅपचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

Congress
मोदी सरकारची कोंडी होताच अमित शहांनी फोन फिरवला अन् फिरली चक्रे

गायक सिद्धू याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. न्यायप्रविष्ठ प्रकरणांबद्दल तुम्ही कशाला विचारत आहात. पंजाबमधील जनताच याबाबत निर्णय घेईल. माध्यमांनी याबाबत निर्णय घेऊ नये, अशी सारवासारव त्यांनी केली.

Congress
भाजपच्या महिला आमदाराला नितीशकुमार म्हणाले, तुम्ही खूप सुंदर दिसता अन्...

सिद्धू हा मनसातील मूसा गावातील आहे. त्याची आई गावची सरपंच आहे. त्याच्या गाण्यातून अनेक वेळा जातीपातीतील भेदभावाचे समर्थन केले जाते. त्याचे खरे नाव सिद्धूसिंग असे आहे. अभियांत्रिकी करीत असताना त्याने कॉलेजमध्ये गाणे सुरू केले. त्याने एका गाण्यात एके-47 रायफलचा वापर केला होता. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात हे गाणे व्हायरल झाले होते. याचबरोबर सिद्धूवर गुन्हाही दाखल झाला होता. तो अनेकवेळा त्याच्या गाण्यात जातीच्या अभिमानाबद्दल बोलताना दिसतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com