काँग्रेस, भाजपसाठी कही खुशी, कही गम! पोटनिवडणुकांचा कौल वाचा सविस्तर

देशातील तीन लोकसभा व 30 विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले.
BJP, Congress
BJP, CongressFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशातील तीन लोकसभा (Lok Sabha Election) व 30 विधानसभेच्या (Assembly Election) जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे (Bypoll) निकाल आज जाहीर झाले. यात काँग्रेस आणि भाजप या प्रमुख दोन पक्षांना काही ठिकाणी यश तर काही ठिकाणी अपयश पचवावे लागले आहे. तीन लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. विधानसभेच्या काँग्रेसने 8 तर भाजपने 7 जागा मिळवल्या असून, इतर ठिकाणी प्रादेशिक पक्षांनी बाजी मारली आहे.

काँग्रेस, भाजप, शिवसेनेला लोकसभेची प्रत्येकी एक जागा

लोकसभेच्या पोटनिवडणुकात हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विजयी झाल्या. मध्य प्रदेशात खांडवा मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर पाटील यांनी विजयाचा झेंडा फडकावला. शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी दादरा नगर हवेलीवर भगवा फडकाला.

हिमाचल, हरियानात भाजपला धक्का

हिमाचल प्रदेशमध्ये फतेहपूर, जुब्बाल-कोटखाई आणि अर्की या विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धक्का देत तिन्ही ठिकाणी विजय खेचून आणला. हरियानात ऐलनाबाद हा पारंपरिक मतदारसंघ इंडियन नॅशनल लोक दलाचे अभय चौटाला यांनी आपल्याकडे कायम राखत सत्ताधारी भाजपला धक्का दिला.

BJP, Congress
कॅप्टन अमरिंदरसिंगांचा नवीन पक्ष अन् नावातच काँग्रेस!

आसाममध्ये भाजपचा मोठा विजय

आसाममध्ये विधानसभेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यात भाजपने 3 जागा जिंकल्या. भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या 'यूपीपीएल'ला दोन जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी भाजपने 5 जागा जिंकत विरोधकांना जोरदार उत्तर दिले आहे.

बंगालमध्ये तृणमूलची जादू

पश्चिम बंगालमधील 4 विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला. यातील 2 जागा आधी भाजपकडे तर 2 तृणमूलकडे होत्या. तृणमूलने आपल्या 2 जागा कायम राखत असतानाच भाजपच्या 2 जागा हिरावून घेतल्या आहेत.

BJP, Congress
आधी उघड बंड अन् नंतर माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला रामराम!

मध्य प्रदेश, कर्नाटकात भाजप, काँग्रेसला संमिश्र यश

मध्य प्रदेशात 3 पैकी 2 जागा भाजपल्या मिळाल्या असून, काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. महाराष्ट्रामध्ये देगलूर-बिलोली विधानसबा मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले आहेत. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस पक्षाने 1 जागा मिळवली आहे. कर्नाटकात भाजपला 1 तर काँग्रेसला 1 जागेवर विजय मिळाला आहे. तेलंगणमध्ये भाजपने सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीली धक्का देत 1 जागा जिंकली.

राजस्थानमध्ये काँग्रेस तर बिहारमध्ये नितीशकुमार

राजस्थानमध्ये दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. बिहारमध्ये दोन्ही जागा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने पटकावल्या आहेत. मेघालयात 2 जागा एनपीपी या पक्षाने आणि 1 जागा यू़डीएफने जिंकली आहे. मिझोराममध्ये एक जागा एमएनएफने जिंकली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com