Karnataka Politics News: भाजपचं 'ऑपरेशन वोट्स' तर काँग्रेसचं 'ऑपरेशन सेव्ह वोट्स'!

Lok Sabha Election 2024 : भाजप असो वा काँग्रेस; अनेकदा धडका मारूनही दक्षिणेकडील सत्तेचं द्वार काही त्यांच्यासाठी उघडलं जात नाही. कारण या दरवाजाची चावीच मुळात त्यांच्या हाती नाही. ही चावी आहे तेथील प्रादेशिक पक्षांच्या हाती!
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Lok Sabha 2024: गेल्याच वर्षी भाजपनं कर्नाटकातील सत्ता गमावली त्यात लोकसभा निवडणूक लागली. त्यामुळं गमावलेलं बहुमत आणि 'अब की बार चार सौ पार' साठी कमवावं लागलेलं बहुमत या कोंडीत कर्नाटकातली भाजप सापडली. कर्नाटकात सर्वांत पहिल्यांदा 'ऑपरेशन लोटस' द्वारे सत्ता पदरी पाडून घेत पुढं देशभरात त्याचा पायंडा पाडणाऱ्या भाजपला आज लोकसभेसाठी मात्र त्याच कर्नाटकात 'ऑपरेशन वोट्स' राबवावं लागलं. तिकडं विधानसभेत बहुमत मिळाल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असला तरी गाफील न राहाता मागच्या निवडणुकीत राहिलेली कसर यंदा भरून काढायचीच या आवेशात काँग्रेस लोकसभेच्या मैदानात उतरलेला दिसला.

भाजप - जनता दल (स.) युती NDA साठी तारक की मारक?

भाजपनं यावेळी लोकसभेच्या 28 जागांपैकी 25 जागा लढवल्या तर NDA मधील घटक पक्ष असलेल्या JD (S) नं 03 जागा लढवल्या. 2019 मध्ये NDA नं लढवलेल्या एकूण 28 जागांपैकी एकट्या भाजपनं 27 जागा लढवल्या होत्या. त्यातील 25 जागांवर विजय मिळवल्यानं भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे.

2023 मध्ये भाजपला राज्यातली सत्ता गमवावी लागली असली तरी कर्नाटकातला मतदार विधानसभा आणि लोकसभेसाठी नेहमी वेगळा विचार करतो हे मागील काही निवडणुकांमधून दिसून आलं आहे. त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून भाजप यावेळी देखील 25 जागांवर लढताना दिसला. यावेळी भाजप सोबत असलेला JD (S) हा प्रादेशिक पक्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत होता.

Lok Sabha Election 2024
Pune Porsche Accident: 'त्या' मुलामुळे माझ्या मुलाला खूप त्रास झाला...; राष्ट्रवादी नेत्याच्या पत्नीला आठवल्या कडू गोष्टी ...

काँग्रेस - जनता दल (स.) आघाडी तुटली; कॉंग्रेसचं एकला चलो रे!

काँग्रेस यावेळी देशात तब्बल 13 राज्यांत एकटा लढतोय. त्यापैकीच एक राज्य म्हणजे कर्नाटक! 2019 मध्ये काँग्रेसचा साथीदार असलेला JD (S) भाजपला जाऊन मिळाल्यानं काँग्रेस यावेळी लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 28 जागा स्वबळावर लढवल्या. 2019 मध्ये काँग्रेस21 जागांवर लढला होता पण काँग्रेसला केवळ एका जागेवर यश मिळालं होतं. त्यावेळी हाच JD (S) पक्ष काँग्रेस सोबत होता. UPA चा घटक पक्ष म्हणून JD (S) च्या वाट्याला 07 जागा आल्या होत्या पण या पक्षालाही अवघी एक जागा जिंकता आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

JD (S) म्हणजे कर्नाटकातील सत्तेच्या कुलपाची चावी!

कर्नाटकातील जनता दल धर्मनिरपेक्ष JD (S) हा एक असा प्रादेशिक पक्ष आहे, जो धड भाजपला पोटभर जेऊ देत नाही ना काँग्रेसला! JD (S) मुळं कर्नाटकात भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष कधी सत्तेत तर कधी सत्तेबाहेर राहिले आहेत. हा पक्ष कधी भाजपकडे झुकलेला असतो तर कधी काँग्रेसकडे सरकलेला दिसतो. कधी NDA तर UPA अशा दोन्ही तंबूंत वावर असलेल्या या पक्षानं त्याच्या याच 'कामगिरी'च्या जोरावर कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद दोनदा पदरात पाडून घेतलं आहे. 2006-2007 आणि 2018 -2019 अशा दोन्ही वेळेस एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री राहिले होते. लोकसभेच्या वेळेसही हा पक्ष कधी भाजपसोबत जातो तर कधी काँग्रेस सोबत राहातो. नाहीतर स्वतंत्र लढताना दिसतो.

एकूणच काय तर भाजप असो की काँग्रेस; कर्नाटकात विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांना आजवर झगडावंच लागलं आहे. तरी देखील कर्नाटकवासीयांनी गतवर्षी कॉंग्रेसच्या पारड्यात टाकलेलं सत्तेचं दान पाहाता यावेळच्या लोकसभेलाही काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतं पडणार का किंवा भाजपनं जे विधानसभेत गमावलं ते तो लोकसभेद्वारे परत कमावणार का, याचं उत्तर येत्या 4 जूनला हमखास मिळणार हे नक्की!

(मालिकेच्या पुढील भागात... आंध्र प्रदेश)

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com