Sudhakar Badgujar:महापालिका कंत्राटदार ते नगरसेवक! सुधाकर बडगुजर कसे बनले गिरीश महाजनांच्या गळ्यातील ताईत!

Sudhakar Badgujar Join BJP: उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात नाशिक हे महत्वाचे शहर आहे. याची सर्व सूत्र भाजपने 'संकटमोचक'गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्या रुपाने भाजपसोबच मोठा नेता आला आहे.
Sudhakar Badgujar news
Sudhakar Badgujar newsSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांचे भाजपने स्वागत करीत त्यांना प्रवेश दिला. बडगुजर भाजपवासी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चीट दिली आहे.

एकेकाळी कुख्यात गुन्हेगार दाऊदचा साथीदार आणि सध्या येरवडात तुरुंगात शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता प्रकरण बडगुजरांवर चांगलेच शेकले होते. सलीम कुत्ता सोबत बडगुजर यांनी केलेले नृत्य आपण सर्वांनी पाहिले होते. एसआयटी स्थापन करुन या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली होती. आता बडगुजर भाजप आल्याने ते क्लीन झाले आहेत.

बडगुजर यांच्यावर टीका केली हे खरे आहे मात्र, सलीम कुत्ता प्रकरणात त्यांच्यावर दाखल गुन्हा संदर्भात कुठलीच कारवाई झालेली नसून ते निर्दोष असल्याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी यांनी दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असतानाच त्यांना क्लीन चीट मिळाली होती, असे सांगत फडणवीसांनी त्यांना भाजपच्या नितीनियमाप्रमाणे वागण्याचा सल्ला दिला.

विविध गुन्हे दाखल असलेले बडगुजर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय कसे झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उत्तर महाराष्ट्रात राजकारणात नाशिक हे महत्वाचे शहर आहे. याची सर्व सूत्र भाजपने 'संकटमोचक'गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्या रुपाने भाजपसोबत मोठा नेता आला आहे.

Sudhakar Badgujar news
Sanjay Raut: कॅबिनेट बैठकीपूर्वी फडणवीसांनी खुर्चीखाली वाकून पाहावं! अघोरी विद्येतून शिंदे गटाची निर्मिती

बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी गिरीश महाजन यांनी विशेष प्रयत्न केले. गेले पंधरा दिवस स्थानिक आमदार सीमा हिरे आणि नाशिक मधील भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्यामुळे बडगुजर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला होता. ज्या दिवशी त्यांचा प्रवेश होता, त्या दिवशी या प्रवेशाबाबत आपल्याला माहित नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. तेच बावनकुळे पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना घेऊन प्रवेशासाठी तत्परतेने प्रदेश कार्यालयात हजर झाले.या सर्व घडामोडींचे सूत्रधार महाजन असल्याचे बोलले जाते.

सहा महिन्यापूर्वी सलीम कुत्ता प्रकरणी बडगुजर अडचणीत सापडले होते. बडगुजर यांच्या नातेवाईकांच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ता याच्यासोबत डान्स करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. हा मुद्दा विधानसभेत नितेश राणे यांनी उपस्थित केला होता. यांची एसआयटी चौकशी करणार अशी घोषणा फडणवीसांनी केली होती. ती घोषणा आता बासनात गुंडाळली गेली आहे.

संजय राऊत यांच्याशी संधान बांधून महानगरपालिकेतील सर्व क्रीमची पदे बडगूजर यांनी मिळवली होती. सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये गेल्याचे सर्वाधिक दुःख खासदार संजय राऊत यांना झाले आहे, कारण गिरीश महाजन आणि बडगूजर यांच्यावर 'सामना'तून राऊतांनी त्यांच्यावर कागदी बाण सोडले आहेत. नाशिकमधील अनेक निष्ठावंतांना डावलून संजय राऊत यांनी बडगूजराना मोठे केले होते, पक्षात बडगूजर यांच्याबाबत नाराजी असतानाही राऊतांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण त्याच बडगूजरांनी पक्षात मान मिळत नसल्याची तक्रार करुन भाजपमध्ये जाणे पसंत केले. स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी बडगूजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला, पण पक्षश्रेष्ठींनी त्यांचा विरोध फारसा मनावर घेतला नाही.

Sudhakar Badgujar news
Hemant Patil: योग, प्राणायाम, सात्त्विक आहार हेच हेमंत पाटलांच्या फिटनेसचे रहस्य

बडगुजरांची नाशिक महापालिकेतील कारकीर्दही वादग्रस्त ठरली आहे. नाशिक पालिकेतील ठेकेदार म्हणून स्वतःच्या कंपनीसाठी गैरप्रकारे करार मिळवण्याचे आरोप बडगुजरांवर आहेत.नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य असताना स्वतःच्या कंपनीसाठी त्यांनी कंत्राट मिळवले, असा आरोप आहे. यासंदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (ACB) आणि पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्या घरावर छापेही टाकण्यात आले होते. पण बडगुजरांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

नाक्यावरचा एक वसुली कार आणि जीवन प्राधिकरणाचा कंत्राटदार म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या सुधाकर बडगुजर यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून नाशिक महानगरपालिकेत प्रवेश केला, त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख उंचावतच गेला, नाशिकमधील आर्थिक 'वजनदार', वादग्रस्त नेता अशी ओळख असलेले बडगूजर गिरीश महाजन यांच्या गळातील ताईत कसे बनले, हा राजकीय संशोधनाचा विषय आहे, असे असले तरी बडगूजर यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलणार, हे मात्र निश्चित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com