Sanjay Raut: कॅबिनेट बैठकीपूर्वी फडणवीसांनी खुर्चीखाली वाकून पाहावं! अघोरी विद्येतून शिंदे गटाची निर्मिती

Sanjay Raut Attack on Shivsena Eknath Shinde, Bharat Gogawale:फडणवीसाच्या जागी आपल्या नेत्याला पद मिळण्यासाठी अघोरी विद्येचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकीपू्र्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खुर्चीखाली वाकून पाहावं, असा मिश्किल टोला संजय राऊत यांनी मारला.
Devendra Fadanvis & Sanjay Raut
Devendra Fadanvis & Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळेच शिवसेनेत फूट पडल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते भरत गोगावले यांनी केला होता. पुण्यातील शिवसेनाचे आक्रमक नेते वसंत मोरे यांनी काही दिवसापूर्वी व्हिडीओ आणि फोटो शेअर भरत गोगावले यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. गोगावले सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निशाण्यावर आहे.

खासदार संजय राऊत यांनी गोगावले यांच्या त्या व्हिडिओचा संदर्भ देत शिवसेनेवर निशाणा साधला. शिंदेचा गट हा अघोरी विद्येतून निर्माण झाला आहे. आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावण्याचा हा प्रयत्न आहे. फडणवीसाच्या जागी आपल्या नेत्याला पद मिळण्यासाठी अघोरी विद्येचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कॅबिनेट बैठकीपू्र्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खुर्चीखाली वाकून पाहावं, असा मिश्किल टोला संजय राऊत यांनी मारला.

शिवसेना कुणापुढे झुकत नाही. असंख्य घाव सहन करुन शिवसेना पुढे गेली आहे . सत्ताधाऱ्यांना शिवसेनेचे कायम भय वाटत आले आहे. अघोरी विद्येतून निर्माण झालेला शिंदे यांचा गटाकडे गांभीर्यीने पाहण्याची गरज नाही, असे टोला राऊतांनी हाणला.सध्या राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे, याबाबत राऊतांना विचारले असता ते म्हणाले, "मराठी आमची मातृभाषा आहे, ती आमची राजभाषा आहे. सरकारने हिंदीची सक्ती करु नये, आमची निष्ठा ही मराठीभाषेसाठीच असेलच, असे राऊत ठामपणे म्हणाले.

Devendra Fadanvis & Sanjay Raut
Hemant Patil: योग, प्राणायाम, सात्त्विक आहार हेच हेमंत पाटलांच्या फिटनेसचे रहस्य

राज ठाकरे- उद्धव ठाकरे युतीबाबत राऊत म्हणाले, "युतीबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही त्याग करण्यासाठी उद्धव ठाकरे तयार आहेत, असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.