Maharashtra Politics: ठाकरे-भाजपमध्ये पुन्हा पॅचअप?; फडणवीसांसोबत चर्चा; तर मुनगंटीवारांची साद

Uddhav Thackeray News: फडणवीसांसोबत हास्यविनोद करत झालेली चर्चा, तसेच मुनगंटीवार यांची साद यामुळे भाजप आणि ठाकरेंमध्ये पुन्हा पॅचअप सुरू असल्याची चर्चाही रंगली आहे.
Sudhir Mungantiwar-Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Sudhir Mungantiwar-Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Sarkarnama

Mumbai News: अगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत विधीमंडळात प्रवेश आणि त्यानंतर विधान परिषदेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची साद यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्याआड काही हालचाली सुरू आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. फडणवीसांसोबत हास्यविनोद करत झालेली चर्चा, तसेच मुनगंटीवार यांची साद यामुळे भाजप आणि ठाकरेंमध्ये पुन्हा पॅचअप सुरू असल्याची चर्चाही रंगली आहे. (Sudhir Mungantiwar appeals again to Uddhav Thackeray for alliance)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले. विधिमंडळात येत असताना त्यांची उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. बऱ्याच कालावधीनंतर दोन जुने मित्र एकत्र आल्याने दोघांमध्ये चालत असतानाच चर्चा रंगली. दोघेही चर्चा आणि हास्यविनोद करतच विधिमंडळात दाखल झाले.

Sudhir Mungantiwar-Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
BJP News : पुढचा मुख्यमंत्री मीच होणार : भाजपत रंगणार शह-कटशहाचे राजकारण

या दोघांच्या एकत्र येण्याची चर्चा राज्यात सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाचे दुसरे एक नेते तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांना पुन्हा युतीसाठी साद घातली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले होते. त्यानंतर अर्थसंकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात ते आज पुन्हा विधान परिषदेत अवतरले.

विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी येत असताना ते फडणवीस यांच्यासोबत विधिमंडळात दाखल झाले. या दोघांच्या एकत्र येण्याची चर्चा राज्यात खुमासदारपणे चर्चेली जात आहे. त्या दोघांमधील चर्चा आणि हास्यविनोद पाहून आमच्यात काही झालेच नाही, असे दोघेही दाखवत होते. त्यातच भाजप आणि उद्धव ठाकरे गटात पुन्हा जवळ येण्याची चर्चा रंगू लागली आहे.

Sudhir Mungantiwar-Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटात अस्वस्थता? शंभूराज देसाई म्हणाले…

उद्धवजी, आपल्याला झाड वाढवायचे, झाडाला फळं येतील, असे मी स्वतः भेटून सांगत होतो. पण, तुम्ही तर झाडाशी असलेले नातेच तोडून टाकले. मी स्वतः तुम्हाला येऊन भेटत होतो. कोणते खत कोणत्या झाडाला दिले पाहिजे, हे सांगत होतो. पण, तुम्ही तर दुसरेच खत टाकले, त्याला फळे कशी लागणार? तुमचा गैरसमज झाला. पण, अजूनही काही बिघडलेले नाही. पुन्हा एकदा उद्धवजी शांतपणे विचार करा, असे म्हणत मुनगंटीवार यांनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना साद घातली.

Sudhir Mungantiwar-Devendra Fadnavis-Uddhav Thackeray
Solapur : पाण्यासाठी गावाची मतदान न करण्याची शपथ; रणजितसिंह मोहिते-पाटलांची लक्षवेधी अन् फडणविसांचे उत्तर

फडणवीसांसोबत फक्त हाय हॅलोची चर्चा : ठाकरे

अलीकडे बंद दाराआड काही चर्चा होतात. आमचीही तशी बंद दाराआड चर्चा झाली तर तुम्हाला कळवू. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फक्त हाय हॅलो चर्चा झाली. बाकी काहीही नाही, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com