राष्ट्रवादीशी संबंधांबाबत सुनील पाटील यांनीच केलं 'दूध का दूध पानी का पानी'!

आपल्याला अडकवले जात असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
Sunil Patil
Sunil Patil
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सुनील पाटील (Sunil Patil) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हा दावा फेटाळून लावत राष्ट्रवादीचा पाटीलशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. या आरोप-प्रत्यारोपांनंतर आता सुनिल पाटील यानेच राष्ट्रवादीशी संबंधांबाबत मोठा खुलासा केला आहे.

माध्यमांशी बोलताना पाटील यांनी 1999 ते 2016 पर्यंत एनसीपीमध्ये होतो. त्यानंतर माझा राजकारणाशी कधीच संबंध आला नाही, असा खुलासा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील याचा राष्ट्रवादीशी यापूर्वी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल देशमुख यांनी मी एकदाच भेटलो होतो. दिलीप वळसे पाटील यांना कधीही भेटलेलो नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Sunil Patil
मुश्रीफ यांच्या जावयाच्या प्रकरणात आता धनंजय मुंडेंची एन्ट्री!

नवाब मलिकांनी रविवारी सकाळी पाटील याचा काही दिवसांपूर्वी फोन आल्याचे सांगितले होते. पाटील यानेही हे खरे असल्याचे सांगितले. मलिकांना आपण भेटलो नाही. माझं दहा तारखेला त्यांच्याशी बोलणे झाले आहे. मी त्यांना मला अडकवले जात असल्याचे सांगितले आणि आता तसंच होत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पाटील यांनी माध्यमांसमोर येत अनेक गोष्टींची पोलखोल केली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात डील झाल्याचेही त्यांनी सांगितले. सॅम डिसूझा, मनिष भानूशाली व किरण गोसावी यांच्यात डील झाले होते. मी 27 सप्टेंबर ते चार ऑक्टोबरपर्यंत अहमदाबादलाच होतो. त्यादिवशी मनिषने पहाटे अडीच वाजता याबाबत सांगितले. ते सर्वजण मुंबईत होते. सकाळी साडे आठ वाजता मला डील झाले असून 50 लाख टोकन दिल्याची माहिती त्याने दिली. पण त्यांची डील कधी झाली, काय झाले हे मला काहीच माहिती नाही.

Sunil Patil
सुनील पाटील आणि मलिक यांनीच शाहरूखकडून खंडणी उकळली..

सॅम डिसोझाबाबत गौप्यस्फोट करताना सुनिल पाटील यांनी एनसीबीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सॅमशी माझा संबंध एक वर्षांपासून आहे. त्याला ड्रग्ज पार्टीची माहिती देण्याचा माझा एकच हेतू होता. त्याला चार महिन्यापूर्वी एका प्रकरणात एनसीबीने समन्स पाठवले होते. ते समन्स त्याने मलाही पाठवले होते. तो त्यावेळी स्टेटमेंट देऊनही आला होता. त्यानंतर मला पैशांसाठी फोन आला. एनसीबीला 25 लाख द्यायचे आहेत, असे सांगितले. पण माझ्याकडे एवढे पैसे नसल्याचे त्याला सांगितले. दुसऱ्यादिवशी त्याचा फोन आला. भाऊ तुम्ही पैसे नाही दिले तर माझे काम होणार नाही का? मी एनसीबीवाल्यांना पैसे दिले आणि सुटलो, असं सॅमने सांगितल्याचा दावा पाटील म्हणाले. हीच आठवण होती म्हणून मी धवल भानूसाली व नीरज यादवला सॅमची माहिती दिल्याचा दावाही पाटील यांनी केला.

Sunil Patil
हॉटेल ललितमध्ये कबाब, शबाब, शराब अन् नवाब ही जुगलबंदी!

या प्रकरणाचा मास्टरमाईंड कुणी वेगळंच आहे. मनिष भानुशालीशी माझा संबंध मित्र म्हणून गेल्या दहा-बारा वर्षांपासून आहे. एका टेंडरसंबंधात मी मनिषसोबत अहमदाबादला गेलो होतो. त्याचे गुजरातच्या मंत्र्यांशी संबंध आहेत. किरण गोसावीला मी चार सप्टेंबरपासून ओळखतो. घटना घडण्याच्या काही दिवस आधी ही ओळख झाली. 22 सप्टेंबरला आम्ही भेटलो. तिथून आम्ही परत आलो, असे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com