सुनील पाटील आणि मलिक यांनीच शाहरूखकडून खंडणी उकळली..

मोहित कंबोज (Mohit Kambhoj) यांचे मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर
Malik-Kambhoj
Malik-Kambhojsarkarnama

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांना कार्डिलिया क्रुझ प्रकरणात अडकविल्याचा कट होता, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून मोहित कंबोज यांनी पलटवार केला आहे. मंत्री, मंत्र्यांची मुले यांचा या साऱ्या प्रकरणात काय रोल होता, हे पण मलिक यांनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. मलिक यांनी केलेल्या दाव्यांतील खोटेपणा आता उघड होत असल्याने त्यांचे डोके फिरले असल्याचाही टोला त्यांनी लगावला.

मलिक यांनी कंबोज यांच्यावर आरोप करत आर्यनखानच्या अपहरणाच्या कटात त्यांचा सहभाग असल्याचा दावा केला होता. तसेच महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी अनेक मंत्र्यांना आणि त्यांच्या मुलांना अडकविण्याचा प्लॅन होता. `उडता पंजाब` नंतर `उडता महाराष्ट्र` प्रतिमा करण्याच धोरण होते, असे सांगत मलिकांनी खळबळ उडवून दिली.

Malik-Kambhoj
`मंत्री अस्लम शेख यांनाही ड्रग केसमध्ये अडकविण्याचा कट होता...`

या आरोपांना कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले. मी समीर वानखेडे यांना ओळखत नाही. सुनील पाटील याचे नाव मी काल जाहीर केल्यानंतर मलिक यांनी त्याचा आपल्याला फोन आल्याचे सांगितले. इतके दिवस हे नाव त्यांनी लपवून ठेवले होते. हाॅटेल द लीलामध्ये शराब, शवाब, कबाब आणि नवाबही होते. तेथील व्हिडीओ फूटेज ताब्यात घेतले तर साऱ्या बाबी पुढे येतील. मी अस्लम शेख यांचे नाव कधीही घेतले नव्हते. पण मलिक यांनी ते घेऊन मोठा आऱोप आपल्याच मंत्र्यावर केला आहे. या पार्टीचा आयोजक कासीम खान याच्याशी अस्लम शेख याचे घनिष्ठ संंबंध होते. कोणत्याही मंत्र्याला दबाव टाकून कार्डिलिया क्रुझवर नेता येईल का? अस्लम मियाॅंचे कॉल रेकॉर्ड चेक करा. ड्रग पेडलर बरोबर त्यांचे संबंध काय आहेत की ते थेट मंत्र्याला जबरदस्ती करत प्रोटोकॉल तोडून पार्टीला नेतात. मंत्रीच नाही तर काही मंत्र्यांची मुले आणि मुली यांचीही हाॅटेल ताजमध्ये कासीम खानशी उठबस होती. त्याचीही माहिती मलिक यांनी आता पुढे द्यावी. कासीम खान आणि मलिक यांचा जावई समीर खान यांचे काय संबंध होते, हे पण मलिक यांनी जाहीर करावे, असे आव्हान कंबोज यांनी दिले. मलिक आणि पाटील यांनीच शाहरूखकडून खंडणी उकळल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

Malik-Kambhoj
नवाब मलिक यांच्या कन्येचे ते पत्र व्हायरल.. माझ्या पतीकडे गांजा नव्हताच!

नवाब मलिक, सुनील पाटील यांनी एनसीबीला बदनाम करण्याचे काम हाती घेऊन शाहरूख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोपही कंबोज यांनी केला. महाराष्ट्राते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे ड्रग तस्कर चिंकू खान याला सह्याद्री अतिथिगृहात भेटले होते. त्याबदद्ल मलिक काही बोलले नाहीत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा या डॅग रॅकेटमध्ये काय सहभाग आहे, हे आता हळूहळू पुढे येईल, असाही दावा कंबोज यांनी केला. सुनील पाटील आणि सॅम डिझोसा यांचे काय संबंध आहेत, हे मलिक यांनी जाहीर करावे. तसेच सुनील पाटील आणि मलिक यांची गेल्या वीस वर्षांपासूनची ओळख आहे, असेही कंबोज यांनी सांगितले. मी मलिक हे तुरुंगात जाण्याची वाट पाहतोय, अशे आव्हान त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com