दिग्गजांना धक्का : सहा आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर!

भारतीय जनता पक्षाचे दोन, तर काँग्रेस पक्षाच्या एका विद्यमान मुख्यमंत्र्याचा समावेश आहे.
Pramod Sawant- CharanjitSingh Channi- PushkarSingh Dhami
Pramod Sawant- CharanjitSingh Channi- PushkarSingh Dhamisarkarnama

नवी दिल्ली : पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालाचे कल हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्ष (bjp) यूपी, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या राज्यांत पहिल्या टप्प्यात आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आपने काँग्रेसला (congress) जोरदार धक्का देत आघाडी घेतली आहे. मात्र, या निवडणुकीत तीन विद्यमान, तर तीन माजी मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन, तर काँग्रेस पक्षाच्या एका विद्यमान मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. (The current three CMs are trailing in the first phase)

गोव्याचे भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात ४३६ मतांनी पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेही पिछाडीवर आहेत. त्यांना भाजपने तिकिट नाकारले होते, त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना जनतेनेने नाकारल्याचे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत आहे.

Pramod Sawant- CharanjitSingh Channi- PushkarSingh Dhami
गोव्यात भाजपला धक्का : मुख्यमंत्री प्रमोद सावंत पहिल्या टप्प्यात ४३६ मतांनी पिछाडीवर!

पंजाबचे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. चन्नी हे पंजाबमध्ये दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पंजाबामध्ये काँग्रेस पक्षाला सत्तेची अपेक्षा हेाती. मात्र, चन्नी सरकारकडून काँग्रेस नेतृत्वाची निराशा झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हेही पंजबामधून पिछाडीवर आहेत. तसेच अकाली दलाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि त्यांचे पुत्र सुखबीरसिंग बादल हेही पिछाडीवर आहेत. कॅप्टन अमरिदरसिंग हेही माजी मुख्यमंत्रीही पिछाडीवर आहेत.

Pramod Sawant- CharanjitSingh Channi- PushkarSingh Dhami
Punjab Election Results : पंजाबमध्ये आपची बल्ले बल्ले; सिद्धू, कॅप्टन पिछाडीवर

उत्तराखंडचे भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे पिछाडीवर आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. याच राज्यात भाजपने एकाच वर्षात तीन मुख्यमंत्री केले होते. मात्र, दिल्लीतून देण्यात आलेले धामी यांचे नेतृत्व स्थानिक जनतेने नाकारल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे उत्तराखंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. मात्र, मुख्यमंत्री धामी हे पिछाडीवर आहे.

गोवा, उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. मात्र, पक्षाचे विद्यमान मुख्यमंत्री या राज्यात पिछाडीवर आहेत. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते काहीसे चिंतेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com