Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणाला मिळालेली नवी डेडलाईनही अपुरी ठरणार?

Maharashtra Government : तीन दिवसांत 35 टक्के काम कसे पूर्ण करणार?
Maratha Reservation Survey
Maratha Reservation SurveySarkarnama
Published on
Updated on

Pimpri : मराठा आरक्षण द्यायचे की नाही हे ठरविण्यासाठी या समाजाचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्याची पाहणी तथा सर्वेक्षण हे राज्य सरकारच्या मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून राज्यभर सुरु  झाले. 31 तारखेपर्यंत त्याची मुदत होती. परंतू, आठवडाभरात अपेक्षित काम न झाल्याने आणि राहिलेल्या एका दिवसात ते पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्याने आयोगाने आता त्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ मंगळवारी (ता. 30) दिली. (Maratha Reservation Survey)

नवी मुदतवाढ ही अत्यंत अपुरी असून त्या कालावधीत पाहणीचे राहिलेले तीस ते चाळीस टक्के काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. आधीच सर्व्हर डाऊनच्या टेक्निकल प्रॉब्लेमसह हौसिंग सोसायट्यांच्या असहकाराचा सामना करावा लागणाऱ्या सर्वेक्षण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हे आव्हान पेलावे लागणार आहे. कारण आठ दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी हे काम निम्मेच झाले असून अपवादात्मक ठिकाणी ते सत्तर टक्यांपर्यंत गेले आहे. पिंपरी-चिंचवडही (Pimpri Chinchwad) त्याला अपवाद नाही. कालपर्यंत (ता. 30) तेथे 65 टक्के हे काम झाले असून राहिलेल्या तीन दिवसांत 35 टक्के ते पूर्ण करायचे शिवधनुष्य ते करणाऱ्यांना पेलायचे आहे.

Maratha Reservation Survey
OBC Reservation News : मराठा आरक्षणाविरोधात 'OBC' कोर्टात; 'सगेसोयऱ्यांची' व्याख्या बदलली?

दरम्यान, आपल्या भागात अशी पाहणी अद्याप झालीच नसल्याचे म्हणजे तेथे ती करणारे आलेच नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे हे काम खूपच मोठ्या प्रमाणावर बाकी असल्याला दुजोरा मिळतो आहे. दुसरीकडे ते अवघ्या दोन दिवसांत पूर्ण होणे शक्य नसल्याचे ते करणाऱ्या काही प्रगणकांनीही सांगितले. तसेच हे सर्वेक्षण योग्य पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी आणखी काही दिवसांची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. (Maharashtra Government)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य मागासवर्ग आयोगाला दुसऱ्यांदा याकामी मुदतवाढ द्यावी लागेल, अशी शक्यता आहे. ती मिळाली नाही, तर ही पाहणी सरकारी पद्धतीने कागदावरच पूर्ण केली जाऊ शकते. तसे झाले, तर त्यातील कच्चे दुवे हे न्यायालयात उघड होऊन पुन्हा मराठा आरक्षणात अडथळा येऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेचे एक तृतीयांश कर्मचारी, अधिकारी या सर्वेक्षणाला लावण्यात आले आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन आणि कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे गालबोट त्याला प्रथम लागले. नंतर काही हौसिंग सोसायट्यांनी ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आत येऊ न दिल्याने ती वेळेत पूर्ण कऱण्यात दुसरा मोठा अडथळा आला. त्यामुळे पहिल्या पाच दिवसांत चाळीस टक्केच पाहणीचे काम झाले. परिणामी आणखी काही कर्मचारी त्यासाठी घेण्यात आले. ते सुट्टीच्या दिवशीही हे कामी करीत आहेत. दुसरीकडे 33 टक्के कर्मचारी हे या कामात गुंतल्याने महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात मोठा व्यत्यय आला आहे.

(Edited By - Rajanand More)

Maratha Reservation Survey
Shirdi News: 'वंचित'मुळे 'महाविकास'मध्ये तिढा वाढला; शिर्डीवर काँग्रेसचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com