Karnataka Politics: येडीयुरप्पांची नाराजी भाजपला भोवणार?; लिंगायत समाज भाजपला तारणार की मारणार?

Karnataka Legislative Assembly Election: कर्नाटकमध्ये कोणत्या पक्षाला मिळणार बहुमत...
BS Yediyurappa
BS YediyurappaSarkarnama

BJP vs Congress vs JDS : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (दि.13 मे ) समोर येणार आहे. निकालानंतर कर्नाटकमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? कोणत्या पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच कोणत्या पक्षाचे सरकार येऊ शकतं? याबाबतची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी 224 जागांसाठी दि.13 मे रोजी मतदान पार पडलं. मतदानानंतर लगेच विविध एक्झिट पोलही समोर आले. काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार असल्याचे जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर सत्ताधारी भाजप दुसऱ्या क्रमांकावर तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर राहिल, अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

BS Yediyurappa
Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेस 140 पार; महत्त्वाच्या एक्झिट पोलने वाढवले भाजपचे टेन्शन...

कर्नाटकमध्ये आजही लिंगायत समाज फार प्रभावशाली असल्याचं पाहायला मिळतं. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी किंवा बहुमत आणण्यासाठी लिंगायत समाजाची मतं हे फार निर्णायक ठरतात. असं बोललं जातं की लिंगायत समाज ज्या पक्षाच्या बाजूने आहे, त्या पक्षाला जास्त जागा मिळतात. त्यामुळे आता या निवडणुकीत लिंगायत समाज कोणत्या पक्षाला तारणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या अर्थात भाजपच्या पाठिमागे मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज होता. पण मध्यंतरी भाजपने बी.एस.येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करत ती जबाबदारी बसवराज बोम्मई यांच्याकडे सोपवली. त्यामुळे राज्यातील लिंगायत समाज भाजपवर काहीसा नाराज झाल्याचं बोललं जातं.

BS Yediyurappa
Karnataka Exit Poll 2023: कर्नाटकात 'जेडीएस' बिघडवणार काँग्रेसचा खेळ ?; चार 'एक्झिट पोल'चा त्रिशंकूचा अंदाज

तर दुसरीकडे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना भाजपने हुबळी धारवाड मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याबरोबरच माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे दोन्ही नेते लिंगायत समाजाचं प्रतिनिधीत्व करतात.

बी.एस.येडियुरप्पा यांच्या प्रमाणेच जगदीश शेट्टर या समाजाचे मोठे नेते मानले जातात. जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं भाजपला नुकसान तर काँग्रेसला फायदा होऊ शकतो. तर दुसरीकडे येडीयुरप्पा यांना भाजपने मध्यंतरी मख्य प्रवाहातून बाजूला केल्याने ते भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता येडीयुरप्पांची नाराजी भाजपला भोवणार का? तसेच लिंगायत समाज भाजपला तारणार की मारणार? हे मात्र, उद्याच्यानिवडणुकीच्या निकालानंतरच पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com