Sangola Sugar Factory News : असा सुरू झाला सांगोला सहकारी साखर कारखाना : शरद पवारांनी संपूर्ण इतिहासच सांगितला

बंद पडलेले दुकान चालू करणारे अशी अभिजित पाटील यांची ओळख आहे
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : वसंतदादा पाटील, औदुंबरअण्णा पाटील यांची ओळख ही नवी साखर कारखानदारी सुरू करणारे म्हणून आहे. पण, अभिजित पाटील यांची ओळख ही जे दुकान बंद पडले आहे, ते दुकान चालू करायचे, अशी आहे. नुसतं चालूच करायचं नाही, तर गिऱ्हाईकाला परवडेल, अशा पद्धतीने चालवायचे, अशी त्यांची पद्धत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजित पाटील यांच्या साखर कारखाने चालविण्याच्या पद्धतीबाबत कौतुक केले. (This is how Sangola Cooperative Sugar Factory started : Sharad Pawar told entire history)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्‌घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, औदुंबरअण्णा पाटील यांनी नवे साखर कारखाने उभे केले. पण, अभिजित पाटील यांनी बंद पडलेले, मोडकळीस आलेले साखर कारखाने सुरू करण्याची नेतृत्वशैली विकसित केली आहे. हे कारखाने ते नुसते चालूच करत नाहीत, तर गिऱ्हाईकाला परवडेल अशा पद्धतीने चालवत आहेत.

Sharad Pawar
Pawar On Pandharpur Ncp Candidate : अभिजित पाटील पंढरपूरचे २०२४ चे राष्ट्रवादीचे उमेदवार : शरद पवारांचे स्पष्ट संकेत

विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात गाळप झालेल्या उसाला त्यांनी पहिला हप्ता २३०० रुपयांचा दिला आहे. आणखी दोनशे रुपये ते देणार आहेत, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून विठ्ठल सहकरी साखर कारखान्याची ओळख असेल, अशा आशावादही पवार यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar
Abhijeet Patil Join NCP : 'विठ्ठल'चे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

एकेदिवशी अभिजित पाटील माझ्याकडे येऊन ‘सांगोल्याचा सहकारी साखर कारखाना चालवला घेत आहे, असे सांगितले. मी म्हटलं, ‘अभिजितराव, काय झालंय काय तुम्हाला. त्या कारखान्यात काय आहे का शिल्लक. पहिला कारखाना जाऊन पहा, असे मी सांगितले. त्यांनी जाऊन पाहिलं, दीपक साळुंखे यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मला येऊन सांगितलं की, सगळं जागेवर आहे.

Sharad Pawar
Solapur NCP NEWS : सोलापूर राष्ट्रवादीची भाकरी हेव्यादाव्यात अडकली अन्‌ करपली...!

धाडसाने, कष्टाने आणि काटकसरीने कारखाना चालवायचा निकाल घेतला, तर कारखाना चालू शकतो. मी म्हटलं तुम्हाला खात्री आहे का, त्यांनी सांगितलं, हो मला खात्री आहे. मी म्हटलं, गो अहेड, काय व्हायचे असेल तर पाहू. आज तो कारखाना १२ वर्षांनंतर चालू झाला आहे, अशी आठवण शरद पवार यांनी या वेळी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com