मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेससह भाजपलाही पाडलं बुचकळ्यात!

राज्यांतील महापालिका निवडणुकांत भाजपचे जिंकेल, असा दावा तृणमूलचे नेते मुकुल रॉय (Mukul Roy) यांनी केला आहे.
Narendra Modi and Mukul Roy
Narendra Modi and Mukul RoySarkarnama
Published on
Updated on

कोलकता : कोलकता महापालिकेच्या (Kolkata Municipal Corporation) निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने (TMC) मोठा विजय मिळवला होता. तृणमूलने भाजपसह (BJP) काँग्रेस (Congress) आणि डाव्यांची (Left Parties) दाणादाण उडवली होती. या तीनही पक्षांना दुहेरी आकडाही पार करता आला नव्हता. आता राज्यांतील इतर महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यात भाजपचे जिंकेल, असा दावा तृणमूलचे नेते मुकुल रॉय (Mukul Roy) यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात आगामी महापालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यातच मुकुल रॉय यांनी केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकांत भाजप मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत नंतर विचारणा केली असता त्यांनी तृणमूल आणि भाजप हे दोन्ही सारखेच पक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरुन राजकीय धुरळा उडू लागला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले रॉय यांनी काही महिन्यांपूर्वीच तृणमूलमध्ये घरवापसी केली आहे.

नुकत्याच झालेल्या कोलकता महापालिकेच्या निवडणुकीत 144 जागांपैकी 134 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा पक्षाने दहा जागा जास्त मिळवल्या आहेत. आता महापौरपदी हकीम यांची निवड झाली आहे. कोलकता महापालिकेचे 39 वे महापौर म्हणून लवकरच ते शपथ घेतील. स्वांतत्र्यानंतर महापौरपदी विराजमान होणारे ते पहिले मुस्लिम ठरतील. हकीम हे महापालिकेच्या 82 क्रमांकाच्या वॉर्डमधून निवडून आले आहेत. ते कोलकता बंदर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. आमदार अतिन घोष यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.

Narendra Modi and Mukul Roy
भाजपवाले सत्तेसाठी वेडे झालेत! पित्याविरोधात लढणाऱ्या राणेंवर केजरीवाल भडकले

खासदार माला रॉय यांची महापालिकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या 88 क्रमांक वॉर्डमधून निवडून आल्या आहेत. त्या आधीही अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी महापालिकेतील विजयनांतर सर्वच नेत्यांना तंबी दिली आहे. महापालिकेच्या कामगिरीची दर सहा महिन्यांनी आढावा घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यात काम न करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारत कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com