भाजपवाले सत्तेसाठी वेडे झालेत! पित्याविरोधात लढणाऱ्या राणेंवर केजरीवाल भडकले

आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राणेंच्या पुत्रावर हल्लाबोल केला आहे.
Arvind Kejriwal

Arvind Kejriwal

Sarkarnama

Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. यातच गोव्यात भाजप (BJP) नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी त्यांचे वडील काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांच्या विरोधात लढण्याची तयारी केली आहे. यावरुन आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.

केजरीवाल यांनी एक व्हिडीओ शेअर करीत विश्वजित राणेंना लक्ष्य केले आहे. यात रामानंद सागर यांच्या लोकप्रिय रामायण मालिकेतील दृश्यांचा वापर करण्यात आला आहे. रामाने पित्यासाठी केलेला त्याग आणि आता राणेंनी वडिलांविरोधात लढण्याची केलेली तयारी याची तुलना केली आहे. भाजप नेते सत्तेसाठी वेडे झालेत, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, विश्वजित राणे यांनी वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना पराभूत करण्याचा निर्धार केला आहे. गोव्यात हे काय घडत आहे? सत्तेसाठी लोक आपल्या पित्याला विसरू लागले आहेत. आपण भगवान रामाला मानणारे हिंदू आहोत. रामाने पित्यासाठी सिंहासनाचा त्याग केला आणि वनवासात गेला. इथे भाजपचे विश्वजित राणे स्वत:ला हिंदू समजतात आणि वडिलांना पराभूत करण्याच्या गोष्टी करतात.

राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा 21 डिसेंबरला केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलली आहेत. राणे यांना पोरीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणाही काँग्रेसने केली आहे. प्रतापसिंह राणे हे 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. आता त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली आहे. या लढतीकडे आतापासूनच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

<div class="paragraphs"><p>Arvind Kejriwal </p></div>
टीव्हीवरील बातमी बघून सुचली केंद्रीय मंत्र्याला खंडणी मागण्याची कल्पना अन्...

गोव्याच्या राजकारणात आतापासूनच राणे पिता-पुत्राच्या या लढाईची चर्चा होऊ लागली आहे. पुत्राविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करून प्रतापसिंह राणे यांनी सगळ्यांनाच धक्का दिला आहे. ते म्हणाले होते की, काँग्रेसचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विनंती केली आहे. पोरीम मतदारसंघातून मी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळे मी पोरीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.

<div class="paragraphs"><p>Arvind Kejriwal </p></div>
ममतांना गोव्याचं गणित जमेना! निवडणुकीआधी पाच नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते. पण त्रिशंकू स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली. हीच काँग्रेसची धूळधाण उडण्याची सुरूवात होती. आता राज्यात काँग्रेसचे केवळ 2 आमदार उरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com