Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरे पुन्हा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी! दिल्ली आंदोलनातून नवी संधी?

Uddhav Thackeray National Politics : आजपर्यतच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा ठाकरेंनी महाराष्ट्राबाहेर जावून दिल्लीच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दिला. विद्यार्थ्यांचा हा मुद्दा देशातील तरुणाईला अपील करणारा आहे.
Uddhav Thackeray's participation and stand on the Delhi protest have brought him back into the national political spotlight.
Uddhav Thackeray's participation and stand on the Delhi protest have brought him back into the national political spotlight.sarkarnama
Published on
Updated on

विनोद राऊत

Uddhav Thackeray News : दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ठाकरे बंधू सक्रीय झाल्याचे दिसले. उद्धव ठाकरे हे आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा दिल्लीतील आंदोलनात थेट उतरले. एका मराठी तरुणाने उभारलेल्या या व्यापक लढ्यात मराठी राजकीय पक्षाची भक्कम साथ मिळाल्याचे चित्र आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर शिवसेनेमध्ये दुसरी फूट घडवून आणली गेली. ठाकरेंचे सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. या विलिकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजूरीही दिली.या दुसऱ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हतबल दिसत होते. तर त्यांचा पक्ष राजकीय दृष्ट्या कमकुवत दिसू लागला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी दिल्लीमध्ये एकाएकी उभ राहीलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने, बॅक फूटला गेलेले उद्धव ठाकरेंचे नेतृत्व पुन्हा राष्ट्रीय राजकारणाच्या रंगमचांवर ठळकपणे समोर आले आहे.

आजपर्यतच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा ठाकरेंनी महाराष्ट्राबाहेर जावून दिल्लीच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दिला. विद्यार्थ्यांचा हा मुद्दा देशातील तरुणाईला अपील करणारा आहे. मुंबई ते नागपूरपर्यंत याबद्दलची चिड रस्त्यावर दिसून आली. त्यामुळे ही संधी तातडीने उद्धव ठाकरे यांनी घेतली. आतापर्यंतच्या ठाकरे यांच्या राजकारणातील हा एक मोठा बदल असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. उद्धव ठाकरे यांनी यापुढे जाऊन विस्कळीत विरोधी पक्षाला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यापुर्वी ममता बॅनर्जी किंवा शरद पवार या भूमिकेत दिसत होते.

दुसरीकडे महाराष्ट्राबाहेरील राजकारणात काडीचा इंटरेस्ट नाही असे स्पष्ट सागंणारे दुसरे ठाकरे बंधू, राज ठाकरे यांनी त्यांचा मुलगा अमित ठाकरे याला मनसे नेत्यांना जंतर मंतरवर उतरवले.मुंबईत देखील अमित ठाकरे विद्यार्थी आंदोलनाला भेटी देत आहे. प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील जंतरमंतरवर जावून आले. राज्यात मराठा आंदोलन उभारणारे मनोज जरांगे यांनी देखील दिल्लीत जाऊन दिपकेंच्या पाठीशी उभे राहीले.

Uddhav Thackeray's participation and stand on the Delhi protest have brought him back into the national political spotlight.
CJP Protest: एकेकाळी मोदी-शहांचा कट्टर समर्थक राहिलेला नेता आला समोर, 'सीजेपी'च्या पेटलेल्या आंदोलनात घेतली उडी,भाजप सरकारला झाप झाप झापलं

मराठी फॅक्टर

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके हे संभाजीनगरचे आहे. अन्ना हजारे यांच्यानंतर केंद्र सरकारला जबर धक्का देणारे दुसरे आंदोलन मराठी माणसाने उभारले आहे. या आंदोलनाला ठाकरेंनी जो पाठींबा दिला त्यामागे मराठी कनेक्शन हे एक नैसर्गिक कारण आहे. मात्र अभिजित दिपके हे उद्धव ठाकरे यांच्याशी फार पुर्वीपासून संपर्कात होत्याचे शिवसेना नेते सांगतात. बोस्टनवरुन एक तरुण भारतात परततो, विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन उभे करतो, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना दिपके याच्याबद्दल सहानूभूती होती. महाविकास आघाडीतून दिपकेना पहिला पाठींबा देणारे उद्धव ठाकरे होते, शिवाजी पार्कमध्ये सीजीपेला पाठींबा देण्यासाठी आंदोलन करणारा शिवसेना उबाठा होती. आणि जंतरमंतरवर जावून आंदोलनाला थेट पाठींबा देणारे उद्धव ठाकरे होते.या घडामोडी एकाकएकी घडलेल्या नाही,याच्या मागे मोठी पार्श्वभूमी असल्याचे शिवसेने नेते सांगतात.

शिवसेना नेते हर्षल प्रधान यांनी सांगितले की, मराठी माणसाला मदत करण्याची शिवसेनेची भूमिका स्थापनेपासून आहे. प्रतिभा पाटील यांना केवळ मराठी असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारण बाजूला सारुन त्यांना राष्ट्रपती पदासाठी जाहिर पाठींबा दिला होता.

मराठी कनेक्शन ठाकरेंसाठी सोपे...

मराठी कनेक्शनमुळे या आंदोलनासोबत जुळणे ठाकरेंसाठी सोपे झाले. पक्ष फुटीचा सर्वात मोठा त्रास ठाकरेंना सहन करावा लागला आहे. मात्र तूम्ही कितीही फोडाफोडी करा आम्ही टिकून आहे असा मेसेज या आंदोलनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पहिल्यापासून या आंदोलनाला पाठींबा देऊन महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा चेहरा ठाकरेंच असल्याचे अधोरेखीत केले आहे, असे राजकीय विश्लेषक सुमित म्हसकर यांनी सांगितले.

Uddhav Thackeray's participation and stand on the Delhi protest have brought him back into the national political spotlight.
Shivsena Politics : उद्धव ठाकरेंची एकमेव महापालिकेतील सत्ता जाणार? ऑपरेशन टायरगनंतर एकनाथ शिंदेंचा नवा डाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com