Vice President of India: उपराष्ट्रपतीपदासाठी 3 नावांची चर्चा : यापैकी एक फायनल होणार की मोदी-शाह सरप्राईज देणार?

Modi Shah political surprise News : भाजपकडे लोकसभेत व राज्यसभेत निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे.
Narendra modi, Amit Shah
Narendra modi, Amit Shah sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे आता येत्या काळात त्यांच्या जागी कोणाला संधी मिळणार ? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. या पदासाठी मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्र्यांसह तीन नावांची चर्चा सुरु आहे. यापैकी एक नाव फायनल होणार की मोदी-शाह सरप्राईज देणार? याची उत्सुकता लागली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी लवकरच निवडणुका होणार असल्याचे गृहीत धरून भाजपकडून राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु झाली आहे.

भाजपकडे लोकसभेत व राज्यसभेत निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळेच भाजपकडून मित्र पक्ष असेलल्या तेलगु देसम, संयुक्त जनता दल (जेडीयू) यांच्यासह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष यांची मनधरणी करावी लागणार आहे. त्यामुळे भाजपने आतापासूनच जुळवाजुळव सुरु केली आहे.

उपराष्ट्र्पती पदासाठी 'ही' तीन नावे चर्चेत

येत्या काळात निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यासोबतच उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांच्याशिवाय या पदासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची नावे देखील चर्चेत आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता या पदासाठी बिनविरोध निवड होण्याची शक्यता अधिक आहे.

Narendra modi, Amit Shah
Sunil Tatkare On Manoj Jarange : 'मनोज जरांगेंनी हवं ते बोलावं पण....', मारहाणीच्या आरोपावर सुनील तटकरेंनी सुनावलं

राजनाथ सिंह यांच्या नावाला 'आरएसएस'ची पसंती

जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या उत्तरधिकाऱ्याची निवड करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघडीनें पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पदासाठी भाजपकडून (BJP) चार नावे शर्यतीत असून त्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांने दिली. 2022 मध्ये उपराष्ट्रपती निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीलाच राजनाथ सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. मोदी सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे ते महत्वाचे नेते आहेत. त्यासोबतच राजनाथसिंह यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ही समर्थन आहे. त्यासोबतच सर्व पक्षांमध्ये ही त्यांना मानाचे स्थान आहे.

Narendra modi, Amit Shah
Mahadev Munde : गळा चिरला, मानेसह हातावर 16 वार...; महादेव मुंडेंच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती आली समोर

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 60 दिवसांत घेणे अपेक्षित

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याचे कारण देत राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे घटनेनुसार उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर संकेतानुसार ही निवडणूक 60 दिवसाच्या घेणे अपेक्षित आहे. 2022 मध्ये निवडणूक 5 जुलै रोजी घोषित झाली होती आणि 31 दिवसात म्हणजे 6 ऑगस्टला मतदान झाले होते. येत्या काळात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तात्काळ घ्यायची झाल्यास संसदेचे अधिवेशन हे 21 ऑगस्टनंतर काही दिवसांसाठी वाढवावे लागणार आहे. जेणेकरून दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करू शकतील. सध्या पीएम मोदी विदेश दौऱ्यावर आहेत. ते भारतात परतल्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Narendra modi, Amit Shah
Manikarao Kokate Vs Bachchu Kadu : रात्रभर ताटकळले पण कृषिमंत्री भेटलेच नाही! बच्चू कडूंना माणिकराव कोकाटेंचा चकवा

संसदेतील सहा जागा रिक्त

लोकसभा व राज्यसभेतील 786 खासदारांपैकी सहा जागा रिक्त आहेत. दोन्ही सभागृहात भाजपला बहुमत नाही. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी भाजपला भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षाची सहमती मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळेच भाजपकडून मित्र पक्ष असेलल्या तेलगु देसम, संयुक्त जनता दल (जेडीयू) यांच्यासह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष यांची मनधरणी करावी लागणार आहे.

Narendra modi, Amit Shah
Manikrao Kokate Politics: विरोधक माणिकराव कोकाटे यांचा पिच्छा सोडेना, अमळनेरला पत्ते खेलो आंदोलन.

निवडणूक जिंकण्यासाठी 394 मताची आवश्यकता

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभेतील सदस्यांना मतदानाचा हक्क असणार आहे. ही निवडणूक जिकंण्यासाठी 394 मताची आवश्यकता आहे. लोकसभेत 542 सदस्यांमध्ये इंडिया आघाडीला 293 खासदारांचा पाठींबा आहे तर राज्यसभेच्या 285 सदस्यापैकी 129 सदस्याचा पाठींबा आहे. राज्यसभेत सध्या सहा जागा रिक्त आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 786 पैकी 422 सदस्यांचे समर्थन असून या बहुमतावर त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Narendra modi, Amit Shah
BJP Vikhe support NCP Kokate : कोकाटे चौहू बाजूनं संकटात, भाजप मंत्री 'संकटमोचन'च्या भूमिकेत; म्हणाले, 'त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य देणार की नाही?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com