Vijaykumar Deshmukh : देवेंद्र फडणवीसांना दिलेला मताधिक्क्याचा शब्द विजयकुमार देशमुख खरा करून दाखवणार?

Solapur Lok Sabha Constituency : माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी महास्वामींना तब्बल 63 हजार 667 मतांचे लीड दिले होते, त्याची पुनरावृत्ती करून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेला शब्द खरा करून दाखवणार का, याची चर्चा आहे.
Vijaykumar Deshmukh-Ram Satpute-Devendra Fadnavis
Vijaykumar Deshmukh-Ram Satpute-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 May : सोलापूर लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा कमळ फुलविण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र या वेळी भाजपपुढे आमदार प्रणिती शिंदे यांचे मोठे आव्हान होते. मतदारसंघातील बदलेली समीकरणे, मराठा आरक्षणाचा प्रभाव, विमानसेवेचा मुद्दा, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी हे स्थानिक मुद्दे विशेष चर्चेत होते. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत ज्या भाजप आमदारांनी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना मतधिक्य दिले, ते आमदार यंदा राम सातपुते यांना लीड देणार का, हा खरा प्रश्न आहे. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी महास्वामींना तब्बल 63 हजार 667 मतांचे लीड दिले होते, त्याची पुनरावृत्ती करून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) दिलेला शब्द खरा करून दाखवणार का, याची चर्चा आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) भाजपचे आमदार राम सातपुते आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या दोन युवा आमदारांमध्ये निकराची लढाई झाली. भाजपचे राम सातपुते यांची खरी मदार ही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा अक्कलकोट, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख (VijayKumar Deshmukh) यांचा सोलापूर शहर उत्तर, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजन पाटील यांचा मोहोळ आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर मतदार संघातील शहरी भागावर आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या ग्रामीण भागात ‘हात’ चालल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपला हद्दवाढ भागातून मोठी अपेक्षा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijaykumar Deshmukh-Ram Satpute-Devendra Fadnavis
Pankaja Munde-Raosaheb Danve : पंकजाताई, दानवेंचा पराभव होणारच; शिवसेना नेत्याचा मोठा दावा

मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भाजपला मताधिक्क्य मिळाले होते. ती मते या वेळी भाजपच्या बाजूने राहण्याची शक्यता कमीच आहे. कारण गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सोलापूर शहराचा पाणीप्रश्न, विमानसेवेचे रखडलेले उड्डाण, सिद्धेश्वर कारखान्याचे चिमणी प्रकरण, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर भाजपला विरोधकांकडून या वेळी नामोहरम करण्यात आले. याशिवाय सातपुते यांना बाहेरचा उमेदवार म्हणूनही काँग्रेसच्या आरोपांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे भाजपला गेल्या दोन निवडणुकीप्रमाणे ही निवडणूक जिंकणे अवघड आहे.

सोलापूर शहर उत्तर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असून या मतदारसंघातून विधानसभेला विजयकुमार देशमुख हे सलग चार वेळा निवडून आले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांना मागील विधानसभा निवडणुकीत जे मताधिक्य होते, ते देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे सातपुते यांना आता किमान तेवढे तरी लीड शहर उत्तरमधून द्यावेच लागणार आहे. त्यासाठी देशमुख यांच्याप्रमाणेच त्यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांनीही पायाला भिंगरी लावून प्रचार केला आहे. शहर उत्तर मतदारसंघातील लीडवरच सातपुते यांच्या विजयाचे समीकरण अवलंबून असणार आहे.

सोलापूर शहर उत्तर मतदासंघात मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एक लाख 63 हजार 963 मतदान झाले होते. आता या वेळी एक लाख 84 हजार 65 एवढे मतदान झाले आहे. मागील लोकसभेच्या तुलनेत वीस हजार 102 मतदान अधिक झाले आहे. हे वाढलेले मताधिक्य कोणाला मिळणार, हे पाहावे लागणार आहे. हा वाढलेला मतदार हा युवक मतदार आहे, त्यामुळे त्यांच्यावर अजूनही मोदींचे गारुड असल्याचे दिसून येते, त्यामुळे शहर उत्तर मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळेल, पण ते किती असणार, याकडे विरोधकांचेही लक्ष असणार आहे.

Vijaykumar Deshmukh-Ram Satpute-Devendra Fadnavis
Code Of Conduct Issue : राज्य सरकारच्या अडचणीत वाढ; आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाचा नकार

महेश कोठेंनी दारूगोळा राखून ठेवला

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख महेश कोठे हे नेते होते. विधानसभा निवडणुकीसाठी ते शहर उत्तरमधून इच्छूक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना ताकद दाखवण्याची संधी होती. मात्र, कोठे यांनी ती संधी गमावली आहे. कदाचित विधानसभेसाठी त्यांनी आपला दारूगोळा राखून ठेवलेला असू शकतो. मात्र, विधानसभेची तोंडावर असलेली निवडणूक पाहता कोठे ज्या प्रमाणात ॲक्टिव्ह दिसायला हवे होते, तेवढे ते दिसले नाहीत, हेही खरं आहे.

डॉ. किरण देशमुख यांच्या नावाची चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून विजयकुमार देशमुख यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. मुलगा किरण यांच्यासाठी देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीत मोठी मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच, फडणवीस यांना मताधिक्क्यांचा दिलेला शब्दही पाळण्याचा प्रयत्न देशमुखांना केल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

Vijaykumar Deshmukh-Ram Satpute-Devendra Fadnavis
Nana Patole Beed Tour : दुष्काळाची दाहकता पाहायला पटोले बीडमध्ये आले; पण मुख्यमंत्री, कृषिमंंत्री ‘नॉट रिचेबल’ झाले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com