Mumbai News : भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात दोषमुक्त करावं, यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबतचा अंतिम युक्तिवाद येत्या दोन सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे खडसे समर्थकांचे डोळे आता दोन सप्टेंबरकडे लागले आहेत. (Final hearing on Eknath Khadse's acquittal application on September 2)
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असताना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पदाची वापर करून पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील प्लॉट बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप खडसेंवर होता. त्या प्रकरणात खडसे यांच्यासह त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी यांची नावे आले होती. त्यापैकी जावई चौधरी यांची नुकतीच कारागृहातून सुटका झालेली आहे. पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
दरम्यान, भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणातून आपल्याला दोषमुक्त करावं, असा अर्ज खडसे यांनी उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर येत्या दोन सप्टेंबर रोजी अंतिम युक्तिवाद होणार आहे. त्यात खडसे यांना दोषमुक्त केलं जातं की नाही, याकडे संपूर्ण परिवाराचे लक्ष असणार आहे. त्या प्रकरणात ईडीनेही युक्तिवाद केलेला आहे. ईडीच्या युक्तिवादावर खडसे यांच्या वतीनं ॲड मोहन टेकावडे बाजू मांडणार आहेत.
दरम्यान, सुनावणीदरम्यान आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी हजर होते. गिरीश चौधरी यांची नुकतीच कारागृहातून सुटका झाली आहे.
काय आहे प्रकरण?
देवेंद फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असा आरोप झाला होता. रेडीरेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप होता, त्यामुळे खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप होऊन अखेर खडसे हे भाजपतून बाहेर पडले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.