Helicopter Crash : या कारणांमुळे झाला असावा अपघात?

अपघातात बिपीन रावत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Bipin Rawat
Bipin RawatSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) गंभीर जखमी झाले आहेत. तमिळनाडूतील (Tamilnadu) कुन्नूर (Coonoor) मध्ये हा अपघात झाला आहे. पण हा अपघात नेमका कसा झाला यावून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. रावत यांच्यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही कसर ठेवली जात नाही. असे असतानाही रावत प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.

रावत हे वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. सुलूर एअरबेसवरून त्यांच्या हेलिकॉप्टने उड्डाण केले होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जण होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रावत यांच्या प्रकृतीही गंभीर असून त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. हा अपघात कुन्नूरमध्ये झाला असून वेलिंग्टनपासूनचे हवाई अंतर केवळ दोन किलोमीटर एवढे आहे.

Bipin Rawat
Helicopter Crash : बिपीन रावत यांच्यासोबत कोण होते? नावे आली समोर...

कुन्नूरमध्ये निलगिरी (Nilgiri) पर्वतरांग आहे. या परिसरात घनदाट जंगल असल्याचे सांगितले जाते. हेलिकॉप्टर अपघातामागे येथील हवामान कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. एमआय 17 हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव असलेले अमिताभ रंजन यांनी सांगितले की, अशा अपघातांसाठी अनेकदा हवामानच कारणीभूत असते. पर्वतरांगांमधील हवामान तसं धोकादायक असतं. त्यामुळेच हवामान हे पहिलं कारण असू शकतं.

मागील काही दिवसांपासून तमिळनाडूमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच अनेकदा दाट धुकं असतं. अशा स्थितीत हेलिकॉप्टर कमी उंचीवरून उडत असल्यास जंगलातील झाडांना धडकून अपघात झाला असावा, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसरी शक्यता म्हणजे, हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असावा. बिघाड झाल्यानंतर लगेच पेट घेत हेलिकॉप्टर कोसळले असावे, असाही अंदाज वर्तविली जात आहे.

भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीतून नेमकं कारण समोर येईल. दरम्यान, या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पण रावत यांच्या प्रकृतीबाबत अद्याप काहीही माहिती सांगितली जात नाही. त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधूलिका, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com