आमदार मंगेश चव्हाण म्हणजेच गिरीश महाजन, असे का म्हटले जाते? हे आहे उत्तर!

चाळीसगावचे आमदार असलेले मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांना गिरीश महाजन यांनी जवळ केले...
Girish Mahajan-Mangesh Chavna
Girish Mahajan-Mangesh Chavnasarkarnama
Published on
Updated on

जळगाव : राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना अटक करण्याचे षडयंत्र रचल्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्हीडीओ क्लिपसह विधीमंडळात सरकारवर बॉम्ब टाकला यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली, यात भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचाही उल्लेख झाला. त्या क्लिपमध्ये आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांना अडकविण्याचा उल्लेख आहे. चव्हाण यांना का अडकवायचे तर मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस, असे संभाषण त्या क्लिपमध्ये असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. त्यामुळे कोण हे मंगेश चव्हाण?असा प्रश्‍न अनेकांना पडला.

आमदार मंगेश चव्हाण हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील युवा आमदार आहेत, अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिले आहे. मंगेश चव्हाण यांचा राजकारणाशी फारसा संबध नव्हता, बी.ए,ची पदवी त्यांची संपादन केली आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेश पाटील हे त्यांचे मित्र ते अगोदर भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव येथील आमदार होते. सन २०१४ च्या विधासभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने उन्मेश पाटील यांना प्रथमच उमेदवारी दिली,त्यावेळी मित्र म्हणून मंगेश चव्हाण यांनी त्यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा राबविली आणि पाटील विजयी होवून आमदार झाले. त्यानंतर उन्मेश पाटील यांच्या समवेत चव्हाण मुंबईत जावू लागले.

Girish Mahajan-Mangesh Chavna
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकार दाऊदच्या पाठीशी उभे आहे का?

मुंबईत येणे जाणे सुरू झाले, त्याच वेळी त्यांनी जुन्या चार चाकी वाहने खरेदी करून विक्रीचा व्यवसाय चव्हाण यांनी सुरू केला. त्या माध्यमातून त्यांची मुंबईत त्यांच्या ओळखी वाढल्या शिवाय आमदार पाटील मित्र म्हणून राजकीय क्षेत्रातही त्यांच्या ओळखी निर्माण झाल्या. त्यावेळी गिरीश महाजन राज्याचे जलसंपदा मंत्री होते, त्यांची महाजन यांच्याशीही ओळख झाली, जिल्ह्यातील युवक असल्यामुळे व निवडणुकीत भाजपचे उमेदवार उन्मेश पाटील यांचा प्रचार केलेला असल्यामुळे महाजन यांच्याशी अधिकच जवळीक निर्माण झाली, पुढे चव्हाण जमीन खरेदी व्यवसायातही आले.

उन्मेश पाटील, गिरिश महाजन आणि मंगेश चव्हाण यांची अधिकच मैत्री झाली, पुढे चव्हाण यांनी महाजन यांच्याशी अधिकच मैत्री घट्ट केली. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ते पाऊले टाकू लागले, चव्हाण युवक तर आहेत परंतु निर्णय घेण्यातही धाडसी आहेत, त्यांचा हा गुण हेरून महाजन यांनी हेरला, व पक्षात त्यांना अधिक सक्रिय केले.

सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणूका जाहिर झाल्या. त्यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार असलेले पाटील हे एका वादात अडकल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली, त्यांच्या जागेवर आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर झाली, मात्र पक्षाने ऐनवेळी उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते खासदार म्हणून निवडूनही आले.

Girish Mahajan-Mangesh Chavna
गिरीश महाजन ठाम राहिले अन् हातचे १० लाख घालवून बसले!

चाळीसगावचे आमदार असलेले उन्मेश पाटील खासदार झाल्यामुळे आमदारकिची जागा रिक्त झाली, त्यावेळी खासदार पाटील यांनी पत्नी सौ. संपदा पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली, त्याच वेळी मंगेश चव्हाण यांनीही पक्षातर्फे उमेदवारीचा दावा केला, त्यामुळे मात्र चव्हाण व खासदार पाटील यांच्या मैत्रीत वाद झाला. परंतु चव्हाण मागे हटले नाहीत,त्यांनी आपल्या उमेदवारीवर दावा कायम ठेवला, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन चव्हाण यांच्या पाठीशी भक्कमपणे राहिले, पक्षाच्या वरीष्ठ स्तरावरून त्यांनी चव्हाण यांना चाळीसगाव विधानसभेची उमेदवारी दिली आणि चव्हाण पहिल्याच प्रयत्नात आमदार म्हणून निवडणूही आले.

Girish Mahajan-Mangesh Chavna
गिरीश महाजनांना मोका लावा, फडणवीस, मुनगंटीवार यांना अडकवा... : असा ठरला प्लॅन

आमदार झाल्यानंतर मंगेश चव्हाण हे गिरीश महाजन यांच्या अधिकच जवळचे झाले. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचे राजकीय वाद आहेत, यातही मंगेश चव्हाण यांनी उडी घेवून महाजन यांची बाजू घेवून खडसे यांच्यावर टिकाही केली होती. आमदार महाजन यांच्या सोबत खंबीरपणे असतात, नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणूकीत महाजन यांच्या आदेशानुसार मंगेश चव्हाण अग्रस्थानी होते. तर भाजपच्या प्रत्येक आंदोलनात ते गिरीश महाजन यांच्या खाद्यांला खांदा लावून सहभाग घेत असतात. महाजन यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून आमदार चव्हाण यांची ओखळ झाली आहे.गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे संबध आहेत. त्यामुळे आता आमदार मंगेश चव्हाणही फडणवीस यांच्या ‘गुड बुक’मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com