मुंबई :मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादासाठीच्या निधी रोखण्यासाठी भारताला यश येत असल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून वादग्रस्त धर्मगुरू झाकिर नाईक याची जर भारताने मागणी केली तर आम्ही त्याला भारताच्या स्वाधीन करण्यास तयार आहोत असे मलेशिया सरकारने म्हटले आहे. झाकीर नाईक याच्यावर मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे.
झाकीर नाईक याच्यावर प्रक्षोभक भाषणासह इतर काही गंभीर आरोप आहे. तो सध्या फरार आहे. मलेशिया सरकारने नाईक याच्याबाबत दाखविलेल्या तयारीचे वृत्त या देशातील माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. मलेशियाचे उपपंतप्रधान अहमद जाहिद हमीदी यांनी म्हटले आहे, की जर भारत सरकारने झाकिर नाईक याची मागणी केली तर त्याला आम्ही भारताच्या हवाली करण्यास तयार आहोत. मात्र दुसरीकडे त्यांनी असेही स्पष्ट केले की झाकिर नाईक हा आमच्या देशात असला तरी त्यांने येथे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळेच त्याचा पासपोर्टही रद्द करण्यात आलेला नाही.
दरम्यान भारताने झाकिर नाईक याच्याबाबत मलेशिया सरकारला एक पत्र पाठविले आहे. एनआई लवकरच त्याला भारतात आणणार असल्याचे वृत्त असून मलेशिया सरकारचे ते याबाबत सहकार्य घेणार असल्याचे वृत्त आहे. प्रक्षोभक भाषणे करून मुस्लिम तरूणांची डोकी भडकविण्याचे उद्योग नाईक करीत होता असा त्याच्यावर आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.