भिलवडी वांगीमधून काँग्रेसकडून लढताना दिवंगत नेते पतंगराव कदम यांना 2009 मध्ये 1 लाख 1 हजार 900 मतं मिळाली होती.
अजित पवार यांना बारामतीत राष्ट्रवादीतून लढताना 2009 मध्ये 1 लाख 2 हजार 707 आणि 2019 मध्ये 1 लाख 265 हजार मतं मिळाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरसमधून लढताना विजयसिंह मोहितेपाटील यांना 2004 मध्ये 1 लाख 4 हजार 712 मतं मिळाली होती.
सातारामध्ये राष्ट्रवादीकडून लढताना शिवेंद्रराजे भोसले यांना 2009 मध्ये 1 लाख 5 हजार 778 मतं मिळाली होती.
अशोक चव्हाण यांना भोकरमधून काँग्रेसकडून लढताना 2009 मध्ये 1 लाख 7 हजार 503 मतं मिळाली.
गणेश नाईक यांना बेलापूरमध्ये 1992 मध्ये शिवसेनेकडून लढताना 1 लाख 9 हजार 1 आणि 2004 मध्ये 1 लाख 18 हजार 276 मतं मिळाली होती.
धीरज देशमुख यांना काँग्रेसच्या तिकिटावर लातूर ग्रामीणमधून लढताना 2019 मध्ये 1 लाख 21 हजार 482 मतं मिळाली.
भाजपचे किसन कथोरे यांना मुरबाडमधून 2019 मध्ये लढताना 1 लाख 36 हजार 040 मतं मिळाली आहेत.
काँग्रेसचे विश्वजित कदम यांना 2019 मध्ये पलूस केडगाव लढताना 1 लाख 62 हजार 521 मतं मिळाली आहेत.